शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ; मुगाची बाजारातच विक्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:24 IST

सणासुदीच्या दिवसांत विकलेल्या मुगाचे चुकारेही वेळेवर मिळत नसल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय मूग खरेदीला उशीर झाला. खरेदी सुरू झाली तर प्रतवारीचे निकष लावण्यात आले. एवढेच नाही, तर सणासुदीच्या दिवसांत विकलेल्या मुगाचे चुकारेही वेळेवर मिळत नसल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, हमीपेक्षा एक ते दीड हजार रुपये कमी दराने त्यांच्याकडे शिल्लक असलेला मूग बाजारात विकणे सुरू केले आहे.मूग पीक परिपक्वतेचा कालावधी ६० ते ६५ दिवसांचा असतो. यावर्षी आॅगस्ट महिन्यात म्हणजे आठ ते दहा दिवस उशिराने मूग काढणीला सुरुवात करण्यात आली; परंतु शासकीय खरेदी केंद्र दीड ते दोन महिने उशिरा सुरू करण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांनी काढणी हंगामाच्या सुरुवातीला अत्यंत अल्प दरात मूग विकला. ज्या शेतकºयांकडे साठवणुकीची व्यवस्था होती, त्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर मूग विक्रीसाठीची आॅनलाइन नोंदणी केली.तथापि, जे काही अल्प शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली, तिथे प्रतवारीचे निकष लावून खरेदी केली जात असून, सणासुदीच्या काळात वेळेवर चुकारेही मिळत नसल्याने शेतकºयांनी बाजारात मूग विक्रीला काढला आहे. शनिवार बाजार बंद होण्याच्या दिवशी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत ४०० क्ंिवटल मूग विक्रीसाठी आला होता. हा एका तालुक्याचा मूग आहे. शेतकºयांना त्यांच्याकडील मुगाला कमीत कमी ४,५००, ते सरासरी सहा हजार रुपये क्ंिवटलप्रमाणे दर मिळाले. यावर्षी शासनाने मुगाला प्रतिक्ंिवटल सात हजार पन्नास रुपये दर जाहीर केले आहेत; परंतु या हमीदराचा फायदा झाला नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.जिल्ह्यात मूग खरेदीला अल्प प्रतिसादजिल्ह्यात तीन लाख शेतकरी आहेत. मूग उत्पादक शेतकरी ३० ते ४० हजार आहेत. त्यापैकी आतापर्यंत १,६८८ शेतकºयांनीच आॅनलाइन नोंदणी केली असून, २३७ उडीद उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीची अंतिम मुदत १५ आॅक्टोबरपर्यंत आहे; परंतु शेतकºयांचा प्रतिसाद नाही.

शासकीय मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून, १५ आॅक्टोबरपर्यंत नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे. शेतकºयांनी नोंदणी करावी तद्वतच काही अडचणी आल्यास तालुका, जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा.- डॉ. प्रवीण लोखंडे,जिल्हा सहकारी उपनिबंधक,अकोला.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAkolaअकोला