शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:23 IST

अकोट : शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या तोडून शेतकऱ्यांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकरी संघटना कटिबद्ध ...

अकोट : शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या तोडून शेतकऱ्यांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकरी संघटना कटिबद्ध असल्याचे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललीत बहाळे यांनी केले. ते शेतकरी संघटनेच्या तीन दिवसीय संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते.

शेतकरी संघटनेची तीन दिवसीय संयुक्त कार्यकारिणी दि.३ सप्टेंबरपासून आयोजित केली होती. या बैठकीत राज्यभरातून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. तीन दिवसीय संयुक्त कार्यकारिणीचा समारोप दि. ५ रोजी करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी ललीत बहाळे यांची नियुक्ती करण्यात आली. महिला आघाडीच्या अध्यक्षपदी प्रज्ञा बापट, तर शेतकरी संघटना युवा आघाडीच्या अध्यक्षपदी सुधीर बिंदू यांची निवड करण्यात आली. यावेळी स्वतंत्र भारत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल घनवट यांची, तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी मधुसूदन हरणे यांची, तर अकोला जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्षपदी लक्ष्मीकांत कौठकर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार वामनराव चटप, मा.आ. सरोज काशीकर, ॲड.दिनेश शर्मा, अनिल घनवट यांनी कार्यकारिणीस मार्गदर्शन केले.

-----------------------

‘लक्ष्मीमुक्तीचे आंदोलन पुन्हा सुरू करणार!’

यावेळी अध्यक्ष ललीत बहाळे यांनी महिलांना मालमत्तेत सहभागी करून घेण्यासाठी लक्ष्मीमुक्तीचे आंदोलन पुन्हा सुरू करणार असल्याचे सांगितले. या बैठकीस माजी अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, मधुसूदन हरणे, अनंतराव देशपांडे, संजय कोले, सतीश दाणी, सीमा नरोडे, शैलजा देशपांडे, ज्योत्स्ना बहाळे, मदन कामाडे, वामनराव जाधव, शशीकांत भदाणे, रामजीवन बोंदर, अनिल चव्हाण, डॉ.आप्पासाहेब कदम, समाधान कणखर, सुरेश जोगळे, सतीश देशमुख, अविनाश नाकट, धनंजय मिश्रा, विलास तातोड, डॉ.नीलेश पाटील यांच्यासह राज्यभरातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे संचालन सतीश देशमुख यांनी केले, शेतकरी संघटनेची शपथ घेऊन कार्यकारिणीचा समारोप करण्यात आला.