शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शेततळय़ासाठी अर्ज करताना शेतक-यांसमोर अनंत अडचणी!

By admin | Updated: March 11, 2016 02:47 IST

विदर्भातील शेतकरी शेततळ्यांपासून वंचित राहण्याची शक्यता.

अकोला: शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे; पण ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत असल्याने विदर्भातील शेतकरी शेततळ्य़ाच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी, पाणलोट व जलसंवर्धन, माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्‍वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना आणली आहे. विदर्भात अलीकडे पावसाचे सरासरी प्रमाण घसरल्याने शेतकरी शेततळ्य़ात पावसाचे पाणी साचवून संरक्षित सिंचन करतात, त्यामुळे विशेषत: खारपाणपट्टय़ात शेततळ्य़ांची गरज आहे. शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकर्‍यांच्या दृष्टीने सोयीचे झाले आहे; पण यावेळी शेततळ्य़ांचे अर्ज ऑनलाइन भरावे लागत असल्याने ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागातील शेतकर्‍यांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन अर्ज भरावे लागत आहेत; तथापि अनेक शेतकर्‍यांना याबाबत माहितीच नसल्याने असे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी कृषी विभागाने पुढे येऊन शेतकर्‍यांना याबाबतची माहिती देण्याची गरज आहे.