शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग लागवडीसाठी तालुका स्तरावर घेणार शेतकऱ्यांचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:24 IST

अकोला : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात फळबाग लागवडीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पुढाकारात जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.या विशेष मोहिमेत १९ जूनपासून जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर तहसील कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

- संतोष येलकर

अकोला : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात फळबाग लागवडीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये १९ जूनपासून जिल्ह्यात तालुका स्तरावर शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन, त्यामध्ये फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात घेणार आहेत.शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात फळबाग लागवडीच्या क्षेत्रात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी फळबाग लागवड योजनेत जास्तीत -जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याकरिता, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पुढाकारात जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत १९ जूनपासून जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर तहसील कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी (रोहयो) यांच्यासह कृषी व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व तालुक्यातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळांमध्येच फळबाग लागवडीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.‘या’ फळपिकांची केली जाणार लागवड!महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात लिंबू, संत्रा, डाळिंब, आंबा, सीताफळ इत्यादी फळपिकांची लागवड करण्यात येणार आहे. फळबाग लागवड करणाऱ्या संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना शासनामार्फत अनुदान देण्यात येणार आहे.जिल्ह्यात फळबाग लागवडीचे प्रमाण वाढावे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी फळबाग लागवडीकरिता जिल्ह्यात तालुका स्तरावर शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन, शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय