शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

सातबारा मिळेना; शेतकऱ्यांना हेलपाटे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:16 IST

अकोला : शासनाचे ‘महाभूलेख ’ संकेतस्थळ बंद असल्याने, जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून ‘आॅनलाइन’ सात-बारा वितरण बंद आहे.

- संतोष येलकर

अकोला : शासनाचे ‘महाभूलेख ’ संकेतस्थळ बंद असल्याने, जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून ‘आॅनलाइन’ सात-बारा वितरण बंद आहे. सात-बारा मिळत नसल्याने, शेतकºयांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत असून, सात-बाराअभावी शेतकºयांची कामे अडकली आहेत. त्यामुळे आॅनलाइन सात-बाराचे वितरण पूर्ववत केव्हा होणार, याबाबत प्रश्नचन्हि निर्माण झाले आहे.शेती संबंधित विविध कामांसाठी शेतकºयांना लागणारा सात-बारा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सात-बारा उतारे संगणकीकृत करण्यात आले असून, आॅनलाइन सात-बाराचे वितरणही सुरू करण्यात आले; परंतु आॅनलाइन सात-बारा उपलब्ध होणाºया महाभूलेख या संकेतस्थळाच्या सर्व्हरवरमध्ये माहिती साठविण्याची क्षमता वाढविण्याचे काम सुरू असल्याने, गत पंधरा दिवसांपासून महाभूलेख संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे आॅनलाइन सात-बारा उतारा वितरणाचे काम पंधरा दिवसांपासून ठप्प झाले आहे. सात-बारा मिळत नसल्याने, शेतजमीन, प्लॉटसंबंधी सर्व कामे अडकली असून, सात-बारा प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यामुळे आॅनलाइन सात-बाराचे वितरण पूर्ववत केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तलाठ्यांकडे धावघेऊनही उपयोग नाही!शासनाच्या ‘महाभूलेख ’ या संकेतस्थळावर आॅनलाइन सात-बारा उपलब्ध होत नसल्याने, सात-बारासाठी शेतकºयांना संबंधित तलाठ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे; परंतु महाभूलेख संकेतस्थळ बंद असल्याने, तलाठ्यांकडूनही सात-बारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे सात-बारासाठी नाहक हेलपाटे सहन करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.सात-बाराअभावी अशी अडकली कामे!आॅनलाइन सात-बारा उपलब्ध होत नसल्याने, जिल्ह्यात शेतजमीन, प्लॉटसंबंधी खरेदी-विक्री, खरीप पीक कर्र्ज, मालमत्तेची नोंद, फेरफार नोंद इत्यादी प्रकारची कामे अडकली आहेत.जिल्ह्यात असे आहेत आॅनलाइन सात-बारा!तालुका              सात-बाराअकोट                ५३१२४अकोला              १०९५३५तेल्हारा              ४१२५६पातूर                 ३१४३४बार्शीटाकळी        ३५५३२बाळापूर              ४७२१४मूर्तिजापूर           ३९६४३...................................एकूण               ३५७७३८सर्व्हरची क्षमता वाढविण्याचे काम सुरू असल्याने, महाभूलेख या संकेतस्थळाद्वारे आॅनलाइन सात-बारा वितरणाचे काम बंद आहे. सोमवारपासून, जिल्ह्यात आॅनलाइन सात-बारा वितरणाचे काम पूर्ववत सुरू होणार आहे.-गजानन सुरंजेउपजिल्हाधिकारी (महसूल).

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी