शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एक किमी चिखल तुडवत आणावे लागते सोयाबीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:38 IST

सततच्या पावसाने शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

- राहूल सोनोने

दिग्रस बु.: गुडघ््यापर्यंत चिखल, ठिकठिकाणी पाणी, त्यातून ३० ते ३५ किलो सोयाबीन गठ्ठे डोक्यावर घेऊन जात असलेले शेतकरी, असे चित्र दिग्रस बु. सह पातूर तालुक्यात दिसत आहे. सततच्या पावसाने शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पातूर तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे उभ्या पिकांना कोंब फुटले आहेत. शेतरस्त्यावर चिखल साचल्याने शेतकºयांना शेतमाल घरी आणताना कसरत करावी लागत आहे. एक ते दोन किमी चिखल तुडवत शेतमाल डोक्यावर वाहून शेतकरी घरी आणत आहे.पातूर तालुक्यातीन अनेक शेतकºयांनी सोयाबीन सोंगणी करून शेतात ठेवले होते. या सोयाबीनला सततच्या पावसामुळे कोंब फुटले आहेत. पावसामुळे खराब झालेले सोयाबीन आणण्यासाठीही शेतकºयांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. शेती मशागतीची कामे ठप्प असल्याने शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी उसंत देताच दिग्रस बु. परिसरात शेतकºयांनी शेतात धाव घेतली. तालुक्यातील सर्वच शेतरस्त्यांवर चिखल साचल्याने बैलगाडी तर दूरच साधे चालताही येत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत शेतकरी एक ते दोन किमी चिखल तुडवत शेतमाल घरी आणत आहेत. पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उर्वरित ३० टक्के सोयाबीन घरी आणण्यासाठी चिखल तुडवावा लागत आहे.

खर्चही वाढलापावसामुळे सोयाबीनला कोंब फुटले आहेत, तसेच दर्जाही घसरला आहे. अशा स्थितीत या सोयाबीनला चांगला भाव मिळेल किंवा नाही, याची शाश्वती नाही. शेतात पडून असलेला शेतमाल घरी आणणे शेतकºयांना शक्य नाही. त्यामुळे मजूर लावून हा माल घरी आणण्यात येत आहे. चिखल व पाण्यात जाण्यासाठी मजूर वेगळी मजुरी मागत असल्याने शेतकºयांचा खर्च वाढला आहे. भावाची शाश्वती नसताना शेतकरी हा खर्च करीत असल्याने आणखी एक संकट शेतकºयांवर आले आहे. परिसरातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी राहुल गावंडे, रामा गावंडे आदींनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmer strikeशेतकरी संप