मूर्तिजापूर : अनभोरा - शेरवाडी शेत शिवारात असलेल्या शेतात तुषार सिंचन पाईपलाईन उचलतांना १ जानेवारी रोजी विषारी सर्पदंश झाल्याने अनभोरा येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिनकर महादेवराव टाले (वय वर्षे ४५) राहणार अनभोरा असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील अनभोरा येथील शेतकरी दिनकर टाले शुक्रवार १ जानेवारी रोजी शेतात तुषार सिंचन पाइपलाइन उचलण्याचे काम करीत होते. दरम्यान त्यांना विषारी सापाने दंश केला. त्यामुळे उपचारासाठी त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांचा सोमवार ४ जानेवारी रोजी संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या कडे दोन हेक्टर शेती आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आहेत.
अनभोरा येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 16:20 IST
Farmer dies of snake bite दिनकर महादेवराव टाले (वय वर्षे ४५) राहणार अनभोरा असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
अनभोरा येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ठळक मुद्दे दिनकर टाले पाइपलाइन उचलण्याचे काम करीत होते. दरम्यान त्यांना विषारी सापाने दंश केला. ४ जानेवारी रोजी संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.