त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा उंबर्डा बाजारचे एक लाख रुपये कर्ज आहे. त्यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, परंतु त्यांना कर्जमाफी न झाल्यामुळे त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपविली. कर्जमाफी न मिळाल्यामुळे याबाबत त्यांनी अनेकदा बँकेला विचारणासुद्धा केली. परंतु त्यात त्यांचे समाधान न झाल्यामुळे शेवटी कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी तसेच नातवंडे असा आप्तपरिवार आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे करीत आहेत.
शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:52 IST