शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील प्रसिद्ध पानवेली देशात फुलणार : अकोट येथे संशोधन केंद्र ; क्षेत्र वाढीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:32 IST

अकोला: विदर्भातील पानवेली देशात प्रसिद्ध आहे; परंतु मागील काही वर्षात याकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो हेक्टरवरील हे क्षेत्र कमी झाले,भरघोस उत्पादन व उत्पन्न देणार्‍या पानवेली  मळ्य़ांचा आता विकास करण्यात येणार असून, नव्याने संशोधन करण्यासाठी अकोला जिल्हय़ातील दिवठाणा पानवेली संशोधन केंद्राचे बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील पानवेली संशोधन केंद्र दिवठाणा येथे हलविण्यात येत आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्हय़ातील दिवठाणा पानवेली संशोधन केंद्राचे बळकटीकरण केले जाणार

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विदर्भातील पानवेली देशात प्रसिद्ध आहे; परंतु मागील काही वर्षात याकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो हेक्टरवरील हे क्षेत्र कमी झाले,भरघोस उत्पादन व उत्पन्न देणार्‍या पानवेली  मळ्य़ांचा आता विकास करण्यात येणार असून, नव्याने संशोधन करण्यासाठी अकोला जिल्हय़ातील दिवठाणा पानवेली संशोधन केंद्राचे बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील पानवेली संशोधन केंद्र दिवठाणा येथे हलविण्यात येत आहे.पानवेली हे नगदी बहुवर्षीय वेलवर्गीय पीक असून, विदर्भातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याच्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर व चंद्रपूर जिल्हय़ात पारंपरिक पद्धतीने लागवड केली जाते. अकोट तालुक्यात कपुरी व बंगला या दोन जातीची लागवड  शेतकरी करतात, या प्रसिद्ध पानांची देशात मागणी असून,  एका एकरात १२ ते १५ लाख रुपये उत्पादन होत असल्याचा कृषी शास्त्रज्ञांचा दावा आहे. अकोला जिल्हय़ातील अकोट तालुका व अमरावती जिल्हय़ातील अंजनगाव भागात पाच हजार हेक्टरवर पानवेलीचे क्षेत्र होते. तथापि, तीव्र पाणी टंचाई, कृषी यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने आता हे क्षेत्र घटले असून, सध्या काही शेतकर्‍यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे पानवेलीचे १.६४ हेक्टर क्षेत्र टिकून आहे. याच क्षेत्राचा विकास करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी देवठाणा पानवेली संशोधन केंद्र बळकट क रण्याचा निर्णय घेतला असून, पूर्व विदर्भातील संशोधन केंद्र दिवठाणा केंद्राला जोडले जाणार. 

कमी खर्चाचे लागवड तंत्रज्ञान विकसितसंशोधन केंद्रात कमी खर्चाचे लागवड व व्यवस्थापन  तंत्रज्ञान  विकसित केले जाणार असून, एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन संशोधन केले जाईल, तसेच रोग प्रतिबंधक जाती विकसित केल्या जातील. सिंचन, पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान विकासावर भर दिला जाईल. उत्पादकता व पानाची साठवण क्षमता वाढविणे, तसेच औषध गुणधर्माचा अभ्यासही होईल.

पानवेलीत औषध गुणधर्म नागवेली, पानवेलीच्या पानात अ,ब व क जीवनसत्व विपूल प्रमाणात असून,पानामध्ये पाचन, मुखशुद्धी, शक्ती, कामवर्धक औषध गुणधर्म आहेत, तसेच डोके दुखणे, वात, हृदयकळा यासाठी उपयोग केला जातो. धार्मिक प्रसंगात या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

औषध गुणधर्म असलेल्या कपुरी, बंगाली पानाला मागणी असून, बाजार भाव चांगले आहेत. संशोधन केंद्राचे बळकटीकरण झाल्यास खारपाणपट्टय़ातील पानमळ्य़ांचा विकास व क्षेत्र वाढीवर भर दिला जाईल. शेतकर्‍यांना कमी खर्चाचे लागवड तंत्रज्ञान पुरविण्यात येईल.डॉ.एम.एस. जोशी,प्रमुख, पानवेली संशोधन केंद्र, डॉ. पंदेकृवि, दिवठाणा, ता. अकोट, जि.अकोला.

टॅग्स :agricultureशेती