शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा फूल शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:42 IST

मागील आठ दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील फूल शेती धोक्यात आली आहे. विशेषत: दिवाळी सणाला महत्त्व असलेल्या झेंडू फुलांच्या शेतीला पावसाचा जबर फटका बसला. पर्यायाने झेंडू फुलाच्या उत्पादनावर परिणाम झाला. फूल उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. 

ठळक मुद्देबाजारात झेंडूच्या फुलांची आवक घटली फूल उत्पादक शेतकरी संकटात!

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : मागील आठ दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील फूल शेती धोक्यात आली आहे. विशेषत: दिवाळी सणाला महत्त्व असलेल्या झेंडू फुलांच्या शेतीला पावसाचा जबर फटका बसला. पर्यायाने झेंडू फुलाच्या उत्पादनावर परिणाम झाला. फूल उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. पातूर शहरातील सुमारे २५0 ते ३00 एकर शेतीत फूल उत्पादक शेतकरी फूल शेती करतात. वर्षभर फुलांची शेती करणारे शेतकरी शहरात आहेत. लिली, गिलाडी, गुलाब, शेवंती व झेंडू फुलासह अनेक फुलांचे उत्पादन घेतात. या सर्व फूल शेतीवर मुसळधार पावसाचा परिणाम झाला. त्यामुळे फूल शेती धोक्यात आली. फुलांमध्ये झेंडू फुलाला गणोशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांमध्ये प्रचंड मागणी असते. त्या दृष्टीने उपरोक्त सणांना झेंडू फुले उपलब्ध व्हावी, यासाठी फूल उत्पादक शेतकरी नियोजन करतात. यावर्षीसुद्धा शेतकर्‍यांनी नियोजन केले; परंतु यावर्षीच्या पावसाअभावी फूल शेती आधीच प्रभावित झाली, त्याचा परिणाम झेंडू फुलाच्या उत्पादनावर सुद्धा झाला. 

दिवाळीचे नियोजन कोलमडलेदिवाळीसाठी झेंडूच्या उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी नियोजन केले; परंतु मागील आठ दिवसांपूर्वीच्या मुसळधार पावसाने झेंडूच्या फुलांची झाडे सडून काळी पडू लागली. त्यासोबत फुलेसुद्धा सडून काळी पडली. त्यामुळे फूल उत्पादन शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले व आता दोन दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी बाजारात विकण्यासाठी फुले नाहीत. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. 

मुसळधार पावसाने झेंडूची झाडे व फुले सडून सुकली. त्याचा परिणाम फुलांच्या उत्पादनावर झाला. दिवाळीत विक्रीसाठी येणारी झेंडूची फुले आता उपलब्ध नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले. - संजय शिवराम फुलारीफूल उत्पादक शेतकरी, पातूर

मुसळधार पावसाने पातूर शहरातील ९0 टक्के फूल शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे ऐन दिवाळीत झेंडू फूल शेतीचेही नुकसान झाले. त्यामुळे फूल उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान मोठय़ा प्रमाणात झाले. - किशोर उगले फूल उत्पादक शेतकरी, पातूर 

टॅग्स :Rainपाऊस