शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कीटकनाशकांचा अकोल्यातून पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 12:51 IST

अकोला: कंपनीने उत्पादित न केलेले कीटकनाशक मिसाइल व बॅव्हिस्टिन या उत्पादनांची यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांना अकोल्यातील महेश एंटरप्रायजेसमधून विक्री झाल्याचे कृषी विभागाच्या चौकशीत पुढे आले.

ठळक मुद्देक्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन कंपनीने त्यांच्या कीटकनाशक उत्पादने बनावट पद्धतीने तयार करून विक्री केली जात असल्याची तक्रार केली.यवतमाळ जिल्ह्यातील २० ते २२ कृषी केंद्रातून या कीटकनाशकाची विक्री झाल्याचे पुढे आले. यवतमाळ व आर्णी येथे टाकलेल्या धाडीत हा प्रकार उघड झाला.

अकोला: कंपनीने उत्पादित न केलेले कीटकनाशक मिसाइल व बॅव्हिस्टिन या उत्पादनांची यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांना अकोल्यातील महेश एंटरप्रायजेसमधून विक्री झाल्याचे कृषी विभागाच्या चौकशीत पुढे आले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील २२ कृषी केंद्र संचालकांवर कारवाई तर सर्वच केंद्रांची तपासणी करून साठा विक्री बंद करण्याचा आदेश पुणे येथील कृषी आयुक्तांनी दिला आहे.क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन कंपनीने त्यांच्या कीटकनाशक उत्पादने बनावट पद्धतीने तयार करून विक्री केली जात असल्याची तक्रार केली. त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी पुणे येथील कृषी आयुक्तांनी सर्व संबंधित जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील २० ते २२ कृषी केंद्रातून या कीटकनाशकाची विक्री झाल्याचे पुढे आले. यवतमाळ व आर्णी येथे टाकलेल्या धाडीत हा प्रकार उघड झाला. त्याची दखल घेत तेथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एन.एम. कोळपेकर, कृषी विकास अधिकारी के.एन. वानखडे यांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये अकोल्यातील महेश एंटरप्रायजेस यांच्याकडून आणलेल्या मिसाइल व बॅव्हिस्टिन या कीटकनाशकांची तपासणी करून तत्काळ विक्री बंद आदेश द्यावा, तसेच पुढील कारवाई करण्याचे पत्र दिले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात चौकशी सुरू झाली आहे.- अकोल्यात प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारवाईदरम्यान, अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी अकोला शहरातील महेश एन्टरप्रायजेसची चौकशी केली. तक्रारीनुसार संबंधितांकडून कागदपत्रे मागवित त्याची पडताळणी सुरू आहे. तर जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी जी.आर. बोंडे यांनी कीटकनाशकाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती