शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पाण्याच्या थंड बाटलीसाठी जादा पैसे आकारणे सुरूच!

By admin | Updated: April 17, 2015 01:52 IST

स्टिंग ऑपरेशन; ग्राहकांची लूट, १८ रुपयांच्या बाटलीची २0 रुपयांमध्ये सर्रास विक्री.

अकोला: पाण्याच्या थंड बाटलीसाठी अधिकतर मुल्यापेक्षा (एमआरपीपेक्षा) जास्त मुल्य आकारले जाऊ नये, असा आदेश वैधमापन विभागाने दिला असतानाही बाटलीतील पाणी थंड करण्याच्या नावाखाली २ रुपये अधिक आकारण्याचा प्रकार अकोला शहरात सर्रास सुरू आहे. अकोला शहरात हजारो लीटर बाटल्या दरोराज विकल्या जाता त. त्यातून शीतल जलाच्या नावाखाली सुरू असलेला हा गोरखधंदा ह्यलोकमतह्णने गुरुवारी ह्यस्टिंग ऑपरेशनह्णच्या माध्यमा तून उजेडात आणला. पाणीटंचाई तसेच अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार लक्षात घेता, स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी म्हणून, विविध कं पन्यांच्या बाटलीमधील पाण्याचा वापर नागरिकांकडून केला जातो. शहरासह ग्रामीण भागातही हॉटेल्स, रेस्टॉरंट व दुकानांवर विविध कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री केली जाते. अलीकडच्या काळात शुद्ध आणि शीतजल म्हणून तहान भागविण्यासाठी ह्यसीलबंदह्ण बाटलीमधील पाण्याच्या वापरात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. जीवाची लाही-लाही करणार्‍या तापत्या उन्हाच्या दिवसात तर थंड पाण्याची बाटली विकत घेऊन, तहान भागविणार्‍या नागरिकांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे साहजिकच उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांकडून पिण्याच्या पाण्यासाठी विविध कंपन्यांच्या थंड पाण्याच्या बाटलीची ग्राहकांकडून होणार्‍या मागणीतही वाढ झाली आहे. ग्राहकांची गरज आणि मागणीचा फायदा घेत,  'शीतजल' विक्रेत्यांकडून मात्र थंड पाणी बाटलीच्या विक्रीत १८ रुपयांची पाण्याची बाटली २0 रुपयांमध्ये ग्राहकांना विकून, त्यामधून माया जमविण्याचा गोरखधंदा चालविला आहे

. .. असे आढळून आले वास्तव!

लोकमत चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गुरुवारी दुपारी ३ वाजता अकोल्यातील गांधी रोडस्थित एका रेस्टॉरंटमध्ये थंड पाणी आणि कोल्ड्रिंक्स घेतले. यावेळी १८ रुपये किमतीच्या थंड पाण्याच्या बाटलीचे विक्रेत्यांकडून २0 रुपये घेण्यात आले व दिलेल्या बिलावरही थंड पाण्याच्या बाटलीपोटी २0 रुपये किंमत आकारल्याचे विक्रेत्याकडून देण्यात आलेल्या बिलात नमूद करण्यात आले. सायंकाळी ५.४५ वाजता शहरातील जुना भाजी बाजार रोडस्थित एका रेस्टॉरंटमध्ये अल्पोपाहार करून, थंड पाण्याची बाटली घेतली असता, १८ रुपये किमतीच्या थंड पाणी बाटलीचे २0 रुपये देयकात आकारण्यात आले.

बाटलीची किंमत नमूद न करताच दिले बिल!

     शहरातील जुना बाजारस्थित एका रेस्टॉरंटमध्ये केलेल्या अल्पोपाहार आणि थंड पाण्याच्या बाटलीपोटी विक्रेत्याकडून एकूण १८0 रुपयांचे बिल देण्यात आले. त्यामध्ये बिलावर थंड पाण्याच्या बाटलीची किंमत नमूद करण्याचा आग्रह विक्रेत्याकडे धरला; मात्र त्याला बगल देत बिलावर पाण्याच्या बाटलीच्या किमतीची रक्कम नमूद न करताच विक्रेत्याने सरसकट १८0 रुपयांचे बिल दिले.