शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील मत्स्य प्रजाती नामशेष

By admin | Updated: July 31, 2015 22:52 IST

नद्यांमध्ये होत असलेल्या विघातक बदलांचा मत्स्य व्यवसायावर परिनाम.

दादाराव गायकवाड/कारंजा लाड (वाशिम): गोदावरी आणि तापी यासारख्या मोठय़ा नद्यांच्या खोर्‍यांनी समृद्ध असल्यामुळे कधी काळी मत्स्यविविधतेसाठी वर्‍हाड प्रसिद्ध होते; परंतु गत काही वर्षांपासून नद्यांमध्ये होत असलेल्या विघातक बदलामुळे या भागातील देशी अर्थात स्थानिक माशांच्या (मत्स्य) प्रजाती नष्ट होत असून, भविष्यात वर्‍हाडातील मत्स्यसृष्टी संपुष्टात येण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. वाशिम जिल्हय़ातील अभ्यासकांनी मासेमारी व्यवसाय करणार्‍यांसोबत केलेल्या पाहणीतून हे वास्तव समोर आले आहे. गत काही वर्षांंपूर्वी वर्‍हाडात भाडर (नोटोप्टेरस), तंबू (अंगुलीया बेंगालेंसीस), वाडीस (टोर खुद्री), पोडशी (टोर मसुल्ला), पालोची (डॅनियो इक्विपिन्नाटस), वारंजा (ओंपॅक बायमाक्युलाटस), बत्तासी (युट्रोपिकथस वाचा) इत्यादी माशांच्या प्रजाती मोठय़ा प्रमाणात आढळायच्या, किंबहुना वर्‍हाड हा भाग या माशांसाठी प्रसिद्ध होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये; परंतु वर्‍हाडातील या माशांच्या प्रजाती निकटच्या काळात संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. वर्‍हाडातील अडाण, बेंबळा इत्यादी नद्यांचे अभ्यासक डॉ. निलेश हेडा यांनी स्थानिक मासेमारांसोबत केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. एकेकाळी वर्‍हाडातील जवळपास सर्वच भागातील नद्यांमध्ये तंबू हा मासा मोठय़ा प्रमाणावर आढळायचा; परंतु औषधी गुणधर्मांंनी संपन्न असलेला हा मासा गेल्या १0 वर्षांपासून आढळलेलाच नसल्याचे माशांचे नमुने नियमितपणे घेणारे डॉ. निलेश हेडा यांनी सांगितले. यामुळे हजारो वर्षांपासून मासेमारीवर उपजिविका अवलंबून असलेल्या भोई जमातीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.