शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विस्तार अधिकाऱ्यांना ‘शो कॉज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 13:31 IST

कमालीचे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांच्या विस्तार अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस शनिवारी बजावण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामपंचायतींच्या तपासणी दरम्यान ग्रामसेवकांनी रेकॉर्ड उपलब्ध न ठेवणे, ग्रामसेवक अनुपस्थित राहणे, यासारखे प्रकार घडले असून, प्रत्येक पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांवर ग्रामपंचायतींची नियमित तपासणीची जबाबदारी आहे, तसेच त्यासाठीची दौरा दैनंदिनी वरिष्ठांकडून मंजूर केली जाते. या सर्व बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांच्या विस्तार अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस शनिवारी बजावण्यात आली. तीन दिवसांत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन अधिकाºयांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. सातही पंचायत समित्यांमध्ये या पथकांकडून आढावा घेण्यात आला. त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर करण्यात आला. त्यामध्ये अनेक गावांतील ग्रामसेवक अनुपस्थित असणे, रेकॉर्ड उपलब्ध न करण्याचे प्रकार घडले आहेत. मोहिमेत ग्रामपंचायतींचे अभिलेखे नमुना १ ते ३३ ची तपासणी करणे, दप्तर तपासणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता सरपंच आणि सचिवांकडून ग्रामपंचायत स्तरावर करून घेणे, यासाठी ग्रामसभेत ग्रामपंचायतींच्या दप्तराचे वाचनही करण्याचे ठरले होते; मात्र अनेक गावांमध्ये या मोहिमेला ‘खो’ बसला आहे.त्यामध्ये बाळापूर, पातूर, अकोट, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यातील गावांचा समावेश आहे. त्यानंतर दोन अधिकाºयांच्या पथकाने प्रत्येक पंचायत समितीमध्ये जाऊन ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांकडून माहिती घेत तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र, प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाणीपट्टी वसुली, भारत निर्माण, महाजल, राष्ट्रीय पेयजल योजनेच्या प्रलंबित कामांचा आढावा तसेच २००२ ते २०१८ पर्यंत दलित वस्ती विकास योजनेतील अपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला.यावेळीही ग्रामसेवक अनुपस्थित होते. सोबतच त्यांनी विविध कामांचे रेकॉर्डही उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर तपासणीला खीळ बसली.प्रत्यक्षात प्रत्येक पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयाने ग्रामपंचायतींमध्ये भेटी देऊन या बाबी अद्ययावत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे.त्यासाठी दौरा दैनंदिनीही वरिष्ठ अधिकाºयांकडून मंजूर केली जाते; मात्र पाच पंचायत समित्यांच्या विस्तार अधिकाºयांनी त्यापैकी कोणतेही काम केले नसल्याचे या मोहिमेत पुढे आले. त्यामुळे त्या सर्वांना तीन दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याची नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी बजावली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत