शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदीसाठी नोंदणीला मुदतवाढ द्या - आमदार नितीन देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:43 IST

नोंदणीची मुदत २७ एप्रिलपर्यंत वाढविण्यात यावी, तसेच त्यासाठी आणखी संपर्क क्रमांकाची व्यवस्था करावी, असे पत्र आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी जिल्हा उपनिबंधकांना दिले.

अकोला : ‘सीसीआय’कडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची कापूस खरेदीसाठी नोंदणीची मुदत मंगळवारी संपल्याने अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. त्यांची समस्या दूर करण्यासाठी नोंदणीची मुदत २७ एप्रिलपर्यंत वाढविण्यात यावी, तसेच त्यासाठी आणखी संपर्क क्रमांकाची व्यवस्था करावी, असे पत्र आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी जिल्हा उपनिबंधकांना दिले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाउन’ असल्याने सर्व प्रकारची कापूस खरेदी सध्या बंद आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता कापूस खरेदी सुरू होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्याच्या पणन संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमाणित कार्यपद्धतीने बाजार समित्यांमध्ये परवानाधारक खासगी व्यापाºयांकडून कापूस खरेदीला मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील सहा समित्यांमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकºयांना १८ ते २१ एप्रिल दरम्यान नोंदणीची संधी देण्यात आली. त्यासाठी बाजार समिती व्यवस्थापनाने एकाच कर्मचाºयाचे संपर्क क्रमांक दिले. तसेच प्रत्यक्ष समिती परिसरातही नोंदणीसाठी कक्ष उघडला; मात्र या कालावधीत अनेक शेतकºयांना नोंदणी करता आली नाही. तसेच एकच क्रमांक असल्याने अनेकदा तो लागत नव्हता, व्यस्त येत होता. काही वेळा नो रिप्लायही झाला. त्यामुळे शेतकºयांना नोंदणीमध्ये अडथळा निर्माण झाला. या सर्व समस्या पाहता कापूस विक्रीसाठी शेतकºयांना नोंदणीची मुदत २७ एप्रिलपर्यंत करावी, तसेच बाजार समित्यांनी आणखी संपर्क क्रमांक उपलब्ध करावे, या सुविधा देण्याची मागणीही आमदार देशमुख यांनी पत्रातून केल्याचे उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस