शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या एकरी १५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा!

By admin | Updated: November 23, 2014 00:02 IST

युरोप खंडात प्रचलित कमी अंतरावरील सघन लागवड पध्दतीचा अवलंब.

हर्षनंदन वाघ/बुलडाणा पावसाला उशीर झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर, युरोप खंडात प्रचलित सघन लागवड पद्धतीचा वापर करण्याच्या, जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकर्‍याच्या प्रयोगाला चांगले यश लाभले असून, एकरी तब्बल १५ क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. बुलडाणा तालुक्यातील तराडखेड येथील प्रयोगशील शेतकरी डॉ. हासनराव देशमुख यांनी त्यांच्या शेतात नेहमीच कापूस लागवडीचे विविध प्रयोग केले आहेत. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. त्यामुळे कपाशीची उशिरा लागवड केली तर झाडांची जास्त वाढ होणार नाही हे हेरून, डॉ. देशमुख यांनी युरोप खंडात वापरल्या जाणार्‍या पद्धतीप्रमाणे, कमी अंतरावरील सघन लागवड पध्दतीचा अवलंब करून, २ बाय १ फूट अंतरावर बीटी कपाशीची लागवड २0 जुलै रोजी केली. कापूस वेचायला जागा रहावी म्हणून, प्रत्येक चार ओळींनंतर सोयाबीनची एक ओळ लावली. सोयाबीन निघाल्यानंतर त्या मोकळ्या जागेतून कापूस वेचणी सुलभ व्हावी, हा त्यामागचा उद्देश होता. दोन ओळीतील व दोन झाडामधील अंतर कमी असल्यामुळे रासायनीक खताची मात्रा, शिफारशीच्या एक-तृतियांश वापरली. हा प्रयोग दोन एकर क्षेत्रावर करण्यात आला. सोयाबीन निघाले असून, तीन क्विंटल उत्पादन झाले आहे. सद्य स्थितीत कपाशीच्या झाडांना सरासरी ३0 पक्व बोंड लागली असून, पाला व फुले भरपूर असल्यामुळे, आणखी १५ ते २0 बोंड पक्व होण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक बोंडाचे वजन ५ ते ६ ग्रॅम आहे. त्यामुळे या प्रयोगात एकरी किमान १५ क्विंटल कापसाचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. परिसरातील ज्या इतर शेतकर्‍यांनी २0 जुलैच्या आसपास लागवड केली, त्यांना कापसाचे कमाल उत्पादन १0 क्विंटलपेक्षा जास्त होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे डॉ. हासनराव देशमुख यांनी केलेला, उशिरा लागवड करून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयोग प्रत्यक्ष पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या शेताला भेटी देत आहेत.बुलडाणा तालुक्यातील तराडखेड गाव बुलडाण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असून, शेतकर्‍यांच्या आग्रहास्तव बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी शेतात मार्गदर्शन कार्यशाळा ठेवण्यात आली असल्याचे डॉ. हासनराव देशमुख यांनी सांगीतले.