शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

‘नवप्रकाश’ योजनेला जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: March 3, 2017 21:02 IST

महावितरण : वीज ग्राहकांना थकबाकीमुक्तीसह वीज जोडणीची संधी

अकोला, दि.२ : थकीत वीजदेयकांमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळून इतर सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेला येत्या ३१ जुलै २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मुदतवाढ मिळालेल्या ‘नवप्रकाश’ योजनेनुसार आता येत्या ३० एप्रिल २०१७ पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास १०० टक्के व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. याआधी ही मुदत ३१ जानेवारी २०१६ पर्यंत होती. तसेच १ मे २०१७ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत मूळ थकबाकीसह व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. या योजनेत ३१ मार्च २०१६ पर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या कृषीपंपधारक, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील (सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळता) वीज ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांना सहभागी होता येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा (डिक्री) मंजूर होऊन १२ वर्षांपेक्षा अधिक झाली असल्यास अशा ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येईल.मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ‘आॅनलाइन’ सोय असून, संबंधित ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग घेऊन थकबाकीमुक्त झालेल्या वीज ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीज जोडणी देण्यात येत आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हीस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येत आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर संबंधित ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची याची माहिती उपलब्ध आहे. ही रक्कम ‘आॅनलाइन’सह धनादेशद्वारेही भरता येणार आहे. याशिवाय महावितरणच्या शाखा ते मंडल कार्यालयात नवप्रकाश योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना थकबाकीच्या रकमेचा तपशील तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांनी नवप्रकाश योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.