शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
6
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
7
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
8
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
9
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
10
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
11
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
12
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
13
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
14
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
15
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
16
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
17
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
18
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
19
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
20
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीची कसरतच!

By admin | Updated: December 24, 2014 00:07 IST

नोव्हेंबरअखेर २0 टक्केच उद्दिष्टपूर्ती : अजून ८0 टक्के बाकी.

संतोष वानखडे / वाशिम : हगणदरीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेल्या राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने, आठ महिन्यांत शौचालय बांधकामाचे केवळ १९.३३ टक्केच उद्दिष्ट गाठले आहे. शेवटच्या चार महिन्यांत ८0 टक्के उद्दिष्ट गाठण्याची कसरत प्रत्येक जिल्हा परिषदेला करावी लागणार आहे. पाच लाख ९६ हजार ४0६ वैयक्तिक शौचालयापैकी राज्यभरात केवळ एक लाख १५ हजार ३0९ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य देण्याची अट आहे. २0१४-१५ या वर्षात राज्यभरात पाच लाख ९६ हजार ४0६ वैयक्तिक शौचालय पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी पाच लाख तीन हजार ७0१ कुटुंब लाभार्थी घटकांमध्ये येतात. या कुटुंबाला शौचालय बांधकाम केल्यानंतर शासनाकडून अनुदानाचा लाभ मिळणार आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने नोव्हेंबरअखेर राज्यभरातील शौचालय बांधकाम आणि अनुदान वितरित केल्याचा आढावा घेतला असता, धक्कादायक बाबी समोर आल्या. नोव्हेंबरअखेर केवळ एक लाख १५ हजार ३0९ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याचे सत्य बाहेर आले. आठ महिन्यात केवळ १९.३३ टक्केच उद्दिष्टपुर्ती झाली आहे. आता शेवटच्या चार महिन्यात ८0 टक्के उद्दिष्ट गाठण्याचे अवघड शिवधनुष्य जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता कक्षाला पेलावे लागणार आहे. राज्यात केवळ ठाणे जिल्ह्याने ९0.५८ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. अर्थात या जिल्ह्यात केवळ ७५२३ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उर्वरीत सर्व जिल्हे शौचालय बांधकाम पूर्ण करण्याच्या ११ ते ५0 टक्केवारीत आहेत. .*नऊ जिल्हे १0 टक्क्यांच्या आत!राज्यातील रत्नागिरी, बीड, सांगली, गडचिरोली, रायगड, नागपूर, वर्धा, सिंधुदुर्ग, जालना या नऊ जिल्ह्यांमध्ये शौचालय बांधकाम १0 टक्क्यांच्या आतमध्येच आहे. चार महिन्यांत उद्दिष्टपूर्ती कशी होईल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.