शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कार्यकारी अभियंत्यांची ग्वाही हवेत; नेकलेस रस्त्याचे काम अधांतरीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 13:18 IST

रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नसल्याने, कार्यकारी अभियंत्यांनी दिलेली ग्वाही हवेतच विरली असून, नेकलेस रस्त्याचे काम अधांतरीच आहे.

ठळक मुद्दे ‘नेकलेस’ रस्ता कामासाठी शासनामार्फत नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. रस्त्याचे काम सोमवार, ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांनी दिली होती. काम ३ सप्टेंबरपासून सुरू करण्याची कार्यकारी अभियंत्यांनी लोकप्रतिनिधींना दिलेली ग्वाही हवेतच विरली.

अकोला : निधी उपलब्ध असताना, गत दोन वर्षांपासून रखडेले शहरातील नेकलेस रस्त्याचे काम ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांनी गत ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दिली; मात्र आठवडा उलटून गेला तरी, रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नसल्याने, कार्यकारी अभियंत्यांनी दिलेली ग्वाही हवेतच विरली असून, नेकलेस रस्त्याचे काम अधांतरीच आहे.महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली अकोला शहरासह जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा गत ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आला. आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, महानगरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ आदींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शहरातील सिव्हिल लाइन ते दुर्गा चौक या ८१६ मीटर लांबी व १५ मीटर रुंदीच्या ‘नेकलेस’ रस्ता कामासाठी शासनामार्फत नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना, गत दोन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू का करण्यात आले नाही, असा सवाल खा. संजय धोत्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना केला होता. या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचे काम बाकी असल्याने रस्त्याचे काम सुरू होणे बाकी असल्याचे उत्तर कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर, या मुद्यावर उपस्थित लोकप्रतिनिधींनी कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरीत, काम केव्हा सुरू करणार, अशी विचारणा केली होती. त्यानुषंगाने नेकलेस रस्त्याचे काम सोमवार, ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींना दिली होती. आठवडा उलटून गेला; मात्र अद्यापही नेकलेस रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नसल्याने, रस्त्याचे काम ३ सप्टेंबरपासून सुरू करण्याची कार्यकारी अभियंत्यांनी लोकप्रतिनिधींना दिलेली ग्वाही हवेतच विरली असून, नेकलेस रस्त्याचे काम अधांतरीच असल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग