शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
3
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
4
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
5
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
6
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
8
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
9
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
10
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
11
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
12
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
13
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
14
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
15
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
16
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
17
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
18
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
19
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
20
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...

कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनाही दिसला कृषी तंत्र विद्यालयातील गलथान कारभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 16:38 IST

कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनाही कृषी तंत्र विद्यालयात गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले.

अकोला: निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयातील गलथान कारभार सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २३ जुलै रोजी प्रकाशित केल्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनाही कृषी तंत्र विद्यालयात गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले. शिक्षणाचा दर्जा नाही. प्राचार्य-कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे.कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि तेथील शेती, गायवाडा, कृषी अवजारे याचा आढावा घेतला. विद्यालयाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, कर्मचारी व प्राचार्यांमध्ये टोकाचे वाद असून, समन्वय नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. तसेच विद्यापीठाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे त्यांना दिसून आले. शेतीची पाहणी केली असता, ३३ हेक्टर शेतजमीन ही पडीत असल्याचे दिसून आले. सुपीक शेतीचा दर्जा खालावत असल्याचेही विनायक सरनाईक यांना दिसून आले. यासोबतच, त्यांनी निंबी मालोकार येथील ग्रामस्थांसोबत चर्चा केली असता, गावातील शेतकºयांनी त्यांच्या जमिनी कृषी तंत्र विद्यालयाला दान दिल्या; परंतु आता कृषी तंत्र विद्यालयाकडूनच त्यांना त्रास होत असल्याचे सांगितले.गुरांना जखमा, वैरण घ्यावे लागते विकतकृषी तंत्र विद्यालयाकडे सध्या ३६ गुरे आहेत. त्यात १0 बैल आहेत. यातील काही गुरांना गंभीर जखमा झाल्या आहेत. या गुरांच्या चराईसाठी विद्यालयाकडे २४ एकर जमीन आहे. एवढी जमीन चराईसाठी उपलब्ध असताना आणि शेतीतील कुटार मोठ्या प्रमाणात निघत असताना, कृषी तंत्र विद्यालयाला गुरांसाठी वैरण विकत घ्यावे लागते.

शेती देखरेखीचा प्रभार ‘त्या’ प्राध्यापकाकडे कसा?कार्यकारी परिषद सदस्य विनायक सरनाईक यांनी भेटीदरम्यान प्राचार्यांकडून कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, विद्यालयातील अल्पदृष्टीबाधित प्राध्यापकाकडे शेती देखरेखीचा प्रभार असल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्या व्यक्तीला डोळ्यांनी दिसत नाही, त्याच्याकडे शेती देखरेखीचा प्रभार कसा दिला आहे, असा प्रश्नही सरनाईक यांनी उपस्थित केला.

काय आढळून आले...कृषी विद्यापीठातील त्रिसदस्यीय समितीनेही केली चौकशीकृषी तंत्र विद्यालयातील कारभाराची चौकशी करण्यासाठी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीने गुरुवारी निंबी मालोकार येथे जाऊन प्राचार्य, प्राध्यापकांची चौकशी केली. तसेच विद्यार्थ्यांकडूनही माहिती जाणुन घेतली. ही समिती कुलगुरूंना अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

कृषी तंत्र विद्यालयातील परिस्थिती गंभीर आहे. शेतकºयांच्या मुलांना शिक्षण देणारी व्यवस्थाच मोडकळीस आली आहे. शेतीसोबतच गुरांची अवस्था बिकट आहे. याकडे कृषी विद्यापीठ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी सुधारणा करावी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच अभ्यासू प्राध्यापक वर्ग, शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात.-विनायक सरनाईक, सदस्यकार्यकारी परिषद, डॉ. पंदेकृवि.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठagricultureशेती