अकोला : श्री शिवाजी महाविद्यालयात सुरू असलेल्या युवा महोत्सवात शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या उ त्साहाला उधाण आले होते. स्व. डॅडी देशमुख रंगमंचावर विद्यार्थ्यांनी विविध लोकनृत्य सादर केले. विविध राज्यातील पारंपरिक वस्त्र परिधान करून महाविद्यालय परिसरात विद्यार्थी दिसत होते. दक्षिणेकडील देवीच्या नृत्यापासून तर राजस्थानी पारंपरिक सण उत्सवापर्यंत विविध नृत्य यावेळी सादर करण्यात आले. यातुन संपूर्ण भारतीय संस्कृतीचे दर्शन रसिकांनी अनुभवले. शुक्रवारी अमराव ती व यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. **सिक्कीमधील तरुणांचा जल्लोषअमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले सिक्कीम ये थील विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवात जल्लोष केला. त्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. मात्र, महाविद्यालया त सर्वत्र फेरफटका मारून अन्य कार्यक्रमही बघितले. याबाबत बोलताना इस्तेकसेजू तनंग व फुतेय भूतीया म्हणाली की, आम्ही युवा महोत्सवात नृत्य सादर केले. श्रोत्यांनी आम्हाला भरभरून दाद दिल्याचे त्यांनी सांगीतले. **मूकनाट्यांनी गाजविले सभागृह स्व. आबासाहेब खेडकर सभागृहात मूकनाट्य स्पर्धा सुरू आहे. यामध्ये विद्यार्थी मूकनाट्याद्वारे समाजातील अनिष्ट चालिरीतींवर प्रकाश टाकीत आहेत. विद्यार्थी सादर करीत असलेल्या मूकनाट्याला सामाजिक किनार असून मूकनाट्यातील विविध प्रसंगावर श्रोते टाळ्या वाजवून दाद देत असून, सभागृह दणाणून सोडत आहेत. ** स्त्रीभ्रूण हत्या, दारू बंदी एकांकिका स्पर्धेचा कणा गत दोन दिवसांपासून मराठा मंडळ कार्यालयात पार पडत असलेल्या एकांकिका स्पर्धेत स्त्रीभ्रूण ह त्या, हुंडा बंदी, दारू बंदी हे प्रमुख विषय आहेत. शुक्रवारी जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी यवतमाळ, बाबासाहेब देशमुख पारवेकर महा. पारवा, लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, शिवशक्ती कला, वाणिज्य महा. बाभूळगाव, सावित्री ज्योतिराव फुले समाजकार्य महा. यवतमाळ, बाबाजी दाते कला व वाणिज्य महा. यवतमाळ, सुधाकरराव नाईक फार्मसी महा. पुसद यांच्यासह विविध विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या.
उत्साहाला उधाण अन लोकनृत्यांची बहर
By admin | Updated: September 20, 2014 00:48 IST