वाशिम : एका युवकाला तोंडावर फायटर मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी माजी आमदार राजगुरू यांच्या थोरल्या मुलासह दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना चिखली सुर्वे मार्गावर १५ जुलै रोजी रात्री ११:३0 वाजताच्या सुमारास घडली. पोलिस शिपाई संतोष सुंदरसिंग राठोड यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, चिखली येथून वाशिमकडे मी व माझा मित्र येत असताना माजी आमदार पुरूषोत्तम राजगुरू यांचा मोठा मुलगा व त्याचा एक मित्र याने मोटारसायकल अडवून मारहाण केली. या मारहाणीमध्ये मित्राच्या तोंडावर दोघांनी मिळून फायटर मारले. यामध्ये मित्राला गंभीर दुखापत झाली. अशा प्रकारच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
माजी आमदार पुत्राविरूद्ध गुन्हा
By admin | Updated: July 17, 2014 01:12 IST