शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांची पतसंस्था शासनाने केली दिवाळखोर घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 12:50 IST

बाळापूर-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. नातिकोद्दीन खतीब हेअध्यक्ष असलेली बाळापूर नागरी सहकारी पतसंस्था शासनाने दिवाळखोर घोषित केली आहे.

बाळापूर-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. नातिकोद्दीन खतीब हेअध्यक्ष असलेली बाळापूर नागरी सहकारी पतसंस्था शासनाने दिवाळखोर घोषित केली आहे. पतसंस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी व ठेवीदारांचे पैसे परत करण्याची जबाबदारी संचालकांवर निश्चित करण्यासाठी शासनाने प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यामुळे बाळापूर तालुक्यात व विशेषत: राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.सहकारी संस्था, बाळापूरचे सहायक निबंधक ए. बी. नादरे यांनी बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेस दिवाळखोर घोषित करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. खतीब व व्यवस्थापक यांना पाठविलेल्या पत्रात संस्था दिवाळखोर घोषित करण्यामागील कारणेही नमूद केली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने संस्थेविरुद्ध संस्था ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळत नसल्याबद्दल केलेल्या तक्रारी, ठेवी परत मिळविण्यासाठी ठेवीदारांनी केलेले उपोषण व काही ठेवीदारांनी संस्था संचालक व कर्मचारी यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्यानंतर झालेले गुन्हे दाखल, संस्थेची कर्जवसुली अल्प प्रमाणात होत असून, ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास संस्था असमर्थ असल्याचे निदर्शनास आलेले आहे व संस्थेचे कामकाज बंद असून, पतसंस्थेचे कार्यालयही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) क (दोन) (चार) मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र शासन सहकार व वस्त्रोद्योग विभागाच्या आदेशानुसार सहायक निबंधक, सहकारी संस्था, बाळापूर यांनी बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेस दिवाळखोर घोषित केले असून, संस्थेचे व्यवहार गुंडाळण्यासाठी सहकारी संस्थेचे माजी सहायक निबंधक एस. डब्ल्यू. डोंगरे यांची पतसंस्थेचे अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे.अ‍ॅड. खतीब यांच्यासह १३ संचालकांवर यापूर्वीच गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBanking Sectorबँकिंग क्षेत्रBalapurबाळापूरNati kodin khateebनातीकोद्दीन खतीब