शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने रक्तदानाचा संकल्प करावा! - पालकमंत्र्यांनी केले आवाहन, वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:42 IST

अकोला: अकोला जिल्हयाचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील याच्या वाढदिवसानिमीत्य शनिवार, २० जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर पार पडले.

ठळक मुद्देजिल्हयाचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील याच्या वाढदिवसानिमीत्य शनिवार, २० जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरा रक्तदात्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, सायंकाळपर्यंत ५०० च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले.पालकमंत्री यांनी यावेळी रक्तदात्यांची भेट घेउन रक्तदान केल्याबदल त्यांचे कौतुक केले.

अकोला: मानवी रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे रक्ताची गरज मानवी रक्तानेच भागवावी लागते. रक्ताची गरज उपलब्धता यामध्ये तफावत असल्यामुळे प्रत्येकाने रक्तदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शनिवारी येथे केले.अकोला जिल्हयाचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील याच्या वाढदिवसानिमीत्य शनिवार, २० जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरा रक्तदात्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, सायंकाळपर्यंत ५०० च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रास आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार हरिष पिंपळे , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकते, माजी आमदार नारायन गव्हाणकर, माजी आमदार तुकाराम बिरकड, नगरसेवक गोपी ठाकरे, डॉ. पुरुषोत्त तायडे, डॉ. अभय जैन, डॉ.प्रशांत अग्रवाल, डॉ.प्रकाश उमप, डॉ.दिलीप सराटे, डॉ. श्रीराम चाफे, डॉ.संजय धोत्रे, डॉ. नामधारी, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, गोपाल खंडेलवाल, श्रीकांत पीसे आदिंची उपस्थीती होती.रक्तदान हे महादान असल्याचे सांगुन पालकमंत्री पुढे म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वापचार रुग्णालयात हजारो रुग्ण भरती होतात. यापैकी अनेकांना रक्ताची गरज असते.रक्ताची गरज व उपलब्धता यामध्ये तफावत असल्यामुळे गरीब रुग्णांच्या नोवाईकांना रक्तासाठी पायपीट करावी लागते. तसेच अपघात, शस्त्रक्रिया, कमी वजन असलेले बालक, हिमोफीलीया व थॅलसीमीया या सारख्या रक्तासबंधी आजारासाठी रक्ताची आवश्यकता असते.म्हणुन प्रत्येकाने रक्तदानाचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पालकमंत्री यांनी यावेळी रक्तदात्यांची भेट घेउन रक्तदान केल्याबदल त्यांचे कौतुक केले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय