शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

गावातील प्रत्येक व्यक्ती विकसित, तरच गाव आदर्श

By admin | Updated: November 22, 2014 02:13 IST

ग्रामस्थांच्या उत्साहाला उधाण; संजय धोत्रेंनी केला केळीवेळीच्या विकासाचा संकल्प!

विवेक चांदूरकर / केशव सांगूनवेढेकेळीवेळी : गावातील रस्ते, नाल्या या भौतिक सुविधांसोबतच जर गावातील प्रत्येक माणूस, युवक व महिलांचा विकास झाला तरच खर्‍या अर्थाने गावाचा विकास झाला, असे म्हणता येईल. विचारात बदल झाला तरच माणूस बदलतो आणि मग त्यातून झालेली गावाची सुधारणा ही चिरकाल टिकून राहते. त्यामुळे गावातील लोकांचा व्यक्तिमत्त्व विकास होणे हाच गाव आदर्श झाल्याचा पुरावा आहे, असे मत खासदार संजय धोत्रे यांनी मांडले. सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये केळीवेळी गावाची निवड झाल्यानंतर पहिलीच ग्रामसभा २१ नोव्हेंबर रोजी गावात पार पडली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय धोत्रे होते. रामसिंग राजपूत यांनी प्रास्ताविकातून केळीवेळी गावाचा इतिहास व स्वातंत्र्य लढय़ातील योगदानाची माहिती उपस्थितांसमोर मांडली. खा. धोत्रे आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, केळीवेळी गावाची निवड ही विचारपूर्वक करण्यात आली. या गावातील लोकांमध्ये सत्कार्य करण्याची उर्मी आहे. विकास करण्याची जिद्द आहे. सर्व समाजाचे लोक एकोप्याने राहतात. या गावातील अनेक लोकांना पाहिले, त्यांनी दिलेला लढा पाहिला. त्यांनी कधीच हार मानली नाही. आता गावकर्‍यांची जबाबदारी अधिकच वाढली. घाणच केली नाही तर साफसफाई करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. आपल्याला या गावाचा असा विकास करायचा आहे की, केळीवेळीचे नाव संपूर्ण देशात जाईल व संपूर्ण देशातील लोक केळीवेळीला बघायला येतील, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली.