शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रेड झोन परिसरातून अकोटात येतात दररोज १०० वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 10:22 IST

अकोला रेड झोन एरियातून दररोज १०० वाहने अप-डाउनकरिता वापरल्या जात आहेत.

ठळक मुद्दे रेड झोन एरियातील अनेक कुटुंब सुरक्षित अकोट शहरात आश्रय घेत आहेत.आॅन ड्युटी बोर्ड लावून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे.

- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शासनाने अधिकृतरीत्या मान्यता न दिलेल्या अनेक वाहनांवर आॅन ड्युटी बोर्ड लावून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे. अकोला रेड झोन एरियातून दररोज १०० वाहने अप-डाउनकरिता वापरल्या जात आहेत. त्यामुळे अकोट शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता स्थानिक प्रशासन व नागरिकांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.कोरोना संकटामुळे प्रशासनाने लॉकडाउन व संचारबंदीमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना अधिकृतरीत्या परवाना दिला आहे; परंतु अकोट शहरात व तालुक्यात शेकडो चारचाकी व दुचाकी वाहनांवर आॅन ड्युटी असे बोर्ड लावलेले आहेत. संगणकामधून आॅनड्युटी प्रिंट काढलेले कागद वाहनांवर चिटकवून जणुकाही शासकीय सेवेतच असल्याचा भास निर्माण करत अनेक रिकामटेकडे सर्रास वाहने फिरवत आहेत. अनेक जण अकोलासह इतर गावांनासुद्धा जाणे-येणे करत आहेत. अकोट शहरात दररोज बँक, शासकीय, अशासकीय कार्यालय, संस्था व इतर ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी हे प्रशासनाचा कुठलाही परवाना नसताना आॅनड्युटी बोर्ड लावून सर्रास अप-डाउन करत आहेत. थेट अकोला महानगर या रेड झोन क्षेत्रातून आॅनड्युटी अप-डाउन सुरू असल्याने अकोट शहरातील सुरक्षा व्यवस्थेला गालबोट लागण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. शासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा शासन निर्णय आहे. तरी सुध्दा अनेक जण रेड झोन एरियातून अप-डाउन करीत आहेत. शिवाय बँक व इतर संस्थेतील अधिकारी, कर्मचारीसुद्धा शासकीय सेवेत असल्याच्या तोºयात बेकायदेशीररीत्या प्रवासी वाहतूक करीत आहेत. प्रशासनाने चेक पोस्ट लावले आहेत. २४ तास नाकेबंदी केली आहे, तरीसुद्धा कोणताही अधिकृत शासकीय परवाना नसताना आॅनड्युटी बोर्ड लावलेले वाहने अकोट शहरात सोडल्या जात आहेत.

अनेक कुटुंब अकोट शहरात वास्तव्यालाअकोलासह रेड झोन एरियातील अनेक कुटुंब सुरक्षित अकोट शहरात आश्रय घेत आहेत. अनेकांनी सर्व साहित्यासह अकोट शहर व तालुका गाठला आहे. घरगुती साहित्याने भरलेली अनेक वाहने आॅन ड्युटी, अत्यावश्यक सेवा अशा बोर्ड लावलेल्या वाहनातून होत आहे काय, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे अनेक जण आॅन ड्युटी बोर्ड लावलेल्या वाहनातून दाखल होत असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी झाली काय, याबाबतची चौकशी करत चेकपोस्टवरच त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणी करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट