लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर टोकन देण्यात आलेल्या शेतकºयांची तूर खरेदी अखेर बुधवारपासून सुरू करण्यात आली. खरेदीच्या पहिल्या दिवशी पाचही खरेदी केंद्रांवर १५६ शेतकºयांची २ हजार १९५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.जिल्ह्यातील १४ हजार ५२४ शेतकºयांची तूर खरेदीची प्रक्रिया मंगळवार, २५ जुलैपासून अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाचही खरेदी केंद्रांवर सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २४ जुलै रोजी दिला होता; परंतु २५ जुलै रोजी खरेदी केंद्रांवर तूर खरेदी सुरू होऊ शकली नाही. २५ जुलैचा मुहूर्त टळल्यानंतर, जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार अखेर २६ जुलै रोजी जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर तूर खरेदी सुरू करण्यात आली.अन् ग्रेडर हजर झाले खरेदी केंद्रांवर!खरेदी केंद्रांवर ग्रेडर रुजू झाले नसल्याने, मंगळवारी जिल्ह्यात तूर खरेदी सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे तूर खरेदीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर ग्रेडरने रुजू व्हावे; अन्यथा तूर खरेदीच्या कामात असहकार पुकारणाºया ग्रेडरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी अकोला, अकोट व तेल्हारा उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि तहसीलदारांना दिला होता. त्यानंतर बुधवारी जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रांवर ग्रेडर रुजू झाले.
अखेर तूर खरेदी सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:32 IST
अकोला : जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर टोकन देण्यात आलेल्या शेतकºयांची तूर खरेदी अखेर बुधवारपासून सुरू करण्यात आली. खरेदीच्या पहिल्या दिवशी पाचही खरेदी केंद्रांवर १५६ शेतकºयांची २ हजार १९५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
अखेर तूर खरेदी सुरू!
ठळक मुद्देपहिल्या दिवशी पाचही खरेदी केंद्रांवर १५६ शेतक-यांची २ हजार १९५ क्विंटल तूर खरेदी