बाळापूर : शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे व गणेशभक्त येथील मन नदीत दरवर्षी गणेश मूर्तीचे विसर्जन करीत असलेल्या स्थळाची दुरवस्था झाल्याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्णच्या शनिवार, ६ सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित होताच त्या बातमीची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन गणेश विसर्जनाचे दरवर्षीचे स्थळ बदलले आहे.मागील अनेक वर्षांंपासून बाळापूर येथील मन नदीत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीकाठी घाटच बांधलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळे व गणेशभक्त थेट नदीपात्रात मूर्तीचे विसर्जन करतात. त्यामुळे गणेश मूर्ती विसर्जनाची परंपरागत जागा बदलवून नदीवर गणेश घाट बांधण्याची मागणी येथील गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांनी व गणेश भक्तांनी तालुका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन केली. यावर्षी पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडलेला नसल्यामुळे सध्याच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याच्या जागेवर कचरा व घाण साचली आहे. तेथे नागरिक शौचास बसतात. शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. तसेच शहरातील कचरादेखील नदीपात्रात टाकला जातो. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे अंगाला खाज सुटते. तसेच नदीपात्रातील पाणी खोल असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने सध्याच्या विसर्जनस्थळी यंदा गणेश विसर्जन करणार नसल्याचा इशारा येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी तालुका प्रशासनाला एका निवेदनाद्वारे दिला होता. याबाबतचे सविस्तर वृत्त ह्यलोकमतह्णने शनिवार, ६ सप्टेंबरच्या अंकात ठळकपणे प्रकाशित केले होते. हे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये झळकताच गणेश भक्तांनी ते व्हॉटस अँपवर अपलोड करून मुख्यालयी न राहणार्या प्रशासकीय अधिकार्याला पाठविले. ते वाचताच काही तासातच पोलिस स्टेशनला तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्ष मो.जमीर शे.इब्राहीम, ठाणेदार घनश्याम पाटील, न.प.मुख्याधिकारी एम.व्ही. आकोटकर यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत उपरोक्त ह्यश्री ह्ण विसर्जनाचे स्थळ बदलून यावर्षी गणेश घाट बांधण्याची मागणी गणेश मंडळ पदाधिकार्यांनी केली. परंतु, दोन दिवसांत गणेश घाट बांधणे शक्य नसल्याची चर्चा झाल्यानंतर गणेशमूर्ती विसर्जनाची तात्पुरती व्यवस्था म्हणून बाराधारी संस्थानसमोर मन नदीच्या पूर्वेकडील भागात ह्यश्री ह्ण विसर्जन करण्यासाठी तेथे दुरुस्ती करण्याचे आश्वासन न.प.मुख्याधिकारी आकोटकर यांनी दिले. गणेश भक्तांनी तेथे श्री विसर्जन करण्यास होकार दिला.या बैठकीनंतर सायंकाळी घनाबाई विद्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे, तहसीलदार समाधान सोळंके, नगराध्यक्ष मो.जमीर शे.इब्राहीम, मुख्याधिकारी आकोटकर, ठाणेदार पाटील आदींनी ह्यश्री ह्ण विसर्जन स्थळाचा मुद्दा निकाली काढण्यास प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल गणेश मंडळाचे आभार मानले. या बैठकीस गणेश मंडळाचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गावडे यांनी शांतता राखणार्या मंडळांसाठी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस न.प.तर्फे १0 हजार रुपये, महसूल प्रशासनातर्फे दुसर्या क्रमांकाचे बक्षीस ७,५00 रुपये, पोलिस प्रशासनातर्फे तिसर्या क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये जाहीर करण्यात आले.
अखेर गणेश विसर्जन स्थळ बदलले
By admin | Updated: September 8, 2014 01:14 IST