शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी प्रमाणीकरण न झालेल्यांनाही मिळणार कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 10:05 IST

कर्जमाफीस पात्र असताना खाते प्रमाणीकरण न झालेल्या राज्यातील शेतकºयांना आता बँकांकडून कर्ज मिळणार आहे.

अकोला: महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या ४० टक्क्यांपेक्षाही अधिक शेतकऱ्यांच्या खात्याचे प्रमाणीकरण न झाल्याने त्यांच्या बँक खात्यात शासन निधी जमा झाला नाही. त्यामुळे त्यांचे खाते थकीत असून, बँकांकडून त्यांना कर्ज देण्यास नकार दिला जात आहे. यावर उपाय म्हणून त्या शेतकऱ्यांची थकीत रक्कम ‘शासनाकडून येणे’ असे दर्शवून त्यांना कर्ज वाटप करण्याचे निर्देश शासनाने सर्वच बँकांना २३ मे रोजी दिले आहेत. त्यामुळे कर्जमाफीस पात्र असताना खाते प्रमाणीकरण न झालेल्या राज्यातील शेतकºयांना आता बँकांकडून कर्ज मिळणार आहे.शासनाने घोषित केलेल्या योजनेनुसार ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत थकीत शेतकºयांचे कर्ज खाते निरंक करून त्यांना पुढील हंगामात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार होते. त्यासाठी ठरलेल्या पद्धतीनुसार शासनाने पोर्टलवर अपलोड केलेल्या यादीनुसार त्यांच्या कर्ज खात्याचे प्रमाणीकरण करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक पात्र शेतकºयांकडे देय असलेली रक्कम बँकेला शासनाकडून देण्यात आली. दरम्यान, २३ मार्चपासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या खात्याच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया थांबली. त्यामुळे शासनाकडूनही त्यांच्या थकीत रकमेचा भरणा बँकांना मिळू शकला नाही. कर्जाची रक्कम शासनाकडून बँकांना दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांना थकबाकीदार न समजता चालू वर्षात कर्जासाठी पात्र ठरविण्यात यावे, तसेच कर्ज वाटप करावे, असे निर्देशही शासनाने २३ मे रोजीच्या निर्णयातून दिले आहेत.त्यानुसार योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या कर्जाची रक्कम ‘शासनाकडून येणे’ अशी नोंद करावी, त्यासाठी बँक व्यवस्थापनांनी करावयाच्या प्रक्रियेबद्दलही निर्देश देण्यात आले. थकीत कर्जदाराची जी रक्कम शासनाकडून बँकांना मिळणे अपेक्षित आहे, त्या रकमेवर १ एप्रिल २०२० पासून व्याज लावावे, रकमेसह त्या व्याजाचा भरणा शासन करणार आहे, असेही शासनाने आदेशात म्हटले आहे.दरम्यान अकोला जिल्ह्यातील ७४,३५५ शेतकºयांची माहिती अपलोड झालेली नाही. त्यामुळे चालू वर्षात ते शेतकरी कर्ज वाटपासाठी पात्र ठरतात की नाही, याबाबतचा संभ्रम होता, तो आता शासन निर्णयामुळे दूर झाला आहे.प्रस्तावनेत गोंधळ; म्हणे, कर्जमाफीचा लाभ देणे शक्य नाहीथकबाकीदार कर्जदार शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने काढलेल्या अध्यादेशामध्ये प्रस्तावनेतच गोंधळ घातला आहे. कर्ज देण्यासाठीचा शासन निर्णयही शनिवारी जारी करण्यात आला आहे. कोविडमुळे राज्यातील उत्पन्नाचे स्रोत आटले असल्याने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित शेतकºयांना नजीकच्या काळात कर्जमाफी देणे शक्य होणार नाही, असे स्पष्ट शब्दात नमूद केले आहे. या अध्यादेशाचे पहिलेच पान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने सरकारच्या धोरणावरच विरोधकांना शंका व्यक्त करण्याची संधी मिळाली.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी