शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सम-विषमचा नियम रद्द; सर्वच दुकाने राहणार खुली; दर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 20:04 IST

दुकानांसाठी लावण्यात आलेला सम-विषम नियम रद्द करून आता दर सोमवार ते शनिवारपर्यंत सर्व बाजारपेठ खुली केली आहे.

ठळक मुद्देदर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जाहीर केला. दुचााकीवर डबलसीट ला परवानगी.

अकोला : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लावण्यात आलेल्या काही नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. अकोल्यात दुकानांसाठी लावण्यात आलेला सम-विषम नियम रद्द करून आता दर सोमवार ते शनिवारपर्यंत सर्व बाजारपेठ खुली केली आहे; मात्र दर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार अकोला शहरासह जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. बाजारपेठा, दुकाने, भाजीपाला, फळे यार्ड, पेट्रोल पंप, सलून, बँका आदी सर्व बाबतीत यापूर्वी लागू असलेले आदेश 31 ऑगस्टपर्यंत कायम राहतील.  ऑगस्ट महिण्याच्या प्रत्येक रविवार कडक संचारबंदी लॉकडाऊन लागू राहिल. या पुर्वीच्या आदेशानुसार निर्बंधामध्‍ये देण्‍यात आलेली  सुलभता व टप्‍पानिहाय लॉकडाऊन उघडण्‍याबाबतचे आदेश  कायम ठेवून सुधारीत आदेश संपूर्ण अकोला शहर व जिल्‍हातील शहरी व ग्रामीण क्षेत्राकरिता लागू राहतील.1.    सर्व प्रकारच्‍या अत्‍यावश्‍यक सेवा अंतर्गत असेलली प्रतिष्‍ठाने, दुकाने व ज्‍यांना यापूर्वी सुरु ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात आलेली आहे ती यापूढे सुध्‍दा नियमित सुरु राहतील.2.   दिनांक ३.६.२०२०  नुसार रस्ता व गल्ली यांच्या एका बाजूला असलेली  सर्व प्रकारची प्रतिष्‍ठाने ,दुकाने          (मॉल्‍स व मार्केट कॉम्‍प्‍लेक्‍स वगळून ) सम व  विषम तारखेस सकाळी  नऊ ते  सात यावेळेत  सुरु ठेवण्‍याबाबतचे  आदेश रद्द करण्‍यात येत आहे.  यापूढे दोन्‍ही  बाजूची   सर्व प्रकारची दुकाने, प्रतिष्‍ठाने  सोमवार ते शनिवार (रविवार वगळून)  सकाळी नऊ ते सायं. सात पर्यंत विहीत करण्‍यात आलेल्‍या अटी व शर्तीनुसार सुरु राहतील.  या बाबत आयुक्‍त, महानगरपालिका व संबंधीत नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी यांनी नियोजन करावे.3.   सर्व प्रकारचे मॉल्‍स व मार्केट कॉम्‍प्‍लेक्‍स हे  खाद्यगृहे , रेस्‍टॉरेन्‍ट वगळता बुधवार दि. ५ ऑगष्‍ट २०२० पासून  सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत सुरु राहतील तथापी अशा मॉल्‍स व मार्केट कॉम्प्लेक्‍स मधील असलेली रेस्‍टॉरेंट मधील किचन व खाद्यगृहे यांना घरपोच सेवा देण्‍याकरिता परवानगी अनुज्ञेय राहील.4.   मद्यविक्री पूर्वीच्‍या आदेशानुसार सुरु राहील.5.   इ कॉमर्स क्षेत्राकरिता सर्व प्रकारच्‍या अत्‍यावश्‍यक व बिगर अत्‍यावश्‍यक सेवा सुरु ठेवण्‍याकरिता परवानगी राहील.6.   महानगरपालिका,नगर परिषद,नगर पालिका क्षेत्रातील सर्वप्रकारची बांधकामे ( सार्वजनिक/खाजगी/शासकीय) ज्‍यांना परवानगी  प्रदान करण्‍यात आलेली आहे ती  सर्व  सुरु राहतील.  पावसाळयापूर्वी करावयाची सर्व प्रकारची ( सार्वजनिक/खाजगी/शासकीय) कामे सुरु राहतील.7.   रेस्‍टॉरेंट व खाद्यगृहे यांचेमार्फत घरपोच सेवा देता येतील.8.   ऑनलाईन शिक्षण व त्‍या संबंधीत उपक्रमांना परवानगी राहील.9.   स्‍वयंरोजगार उपक्रमासंबंधी असलेल्‍या व्‍यक्‍ती उदा. नळ कारागीर, ईलेक्‍ट्रीशिएन, किड नियंत्रक, तांत्रीक कामे करणारे यांना त्‍यांची कामे करण्‍याची परवानगी अनुज्ञेय राहील.10. सर्व प्रकारचे वाहन दुरुस्‍ती गॅरेज , कार्यशाळा यांनी वाहन दुरुस्‍ती करिता ठराविक वेळ देवून कामे करावी .11. अत्‍यावश्‍यक तसेच कार्यालयीन कामाकरिता जिल्‍हा अंतर्गत हालचाल करण्‍यास परवानगी अनुज्ञेय राहील.12. ग्राहकांनी दुकानामध्‍ये खरेदी करण्‍याकरिता जवळपास असलेल्‍या बाजारपेठेचा वापर करावा. शक्‍यतो दुरचा प्रवास करुन खरेदी करणे टाळावे.13. लग्‍न  समारंभ व  अंतिम संस्‍काराकरिता  यापूर्वी पारीत करण्‍यात आलेले आदेश कायम ठेवण्‍यात येत आहे.14.      सर्व बाहय ठिकाणच्‍या सार्वजनिक हालचाली हया पूर्वी दिलेल्‍या निर्बधासह सुरु राहतील.15.      वृत्‍तपत्र व वृत्‍तपत्र छपाई व वितरणास घरपोच सेवासह परवानगी अनुज्ञेय राहील.16. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये ( विद्यापिठ, महाविद्याल, शाळा ) येथील अशैक्षणिक कर्मचारी , संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना इमाहिती उत्‍तर पत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे इ. कामाकरिता परवानगी अनुज्ञेय राहील.17.      सर्व प्रकारची केशकर्तनालयाची दुकाने, सलुन, ब्‍युटीपालर्र या कार्यालयाचे पूर्वीचे आदेशानुसार सुरु राहतील.18. बाहय असंघीक खेळ( Outdoor Games) उदा. गोल्‍फ, फायर रेन्‍ज, जिम्‍न्‍यॉस्टिक , टेनिस , बॅडमिंटन, मलखांब या खेळांना भौतिक व सामाजिक अंतर राखून तसेच निर्जतुंकीकरण व प्रतिबंधात्‍मक उपाययोजनासह दिनांक  ५ ऑगष्‍ट २०२० पासून सुरु ठेवण्‍यास परवानगी अनुज्ञेय राहील. तथापी जलतरण तलाव यांना सुरु ठेवण्‍यास परवानगी राहणार नाही.19. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक यांना टॅक्‍सी, कॅब व अॅग्रीगेटरसाठी अत्‍यावश्‍यक वेळे…

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक