शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मेल्यानंतर अंत्यसंस्कारासाठीही करावा लागला संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 19:16 IST

Sindjhedraja News स्मशानभूमी नसल्याने दुसऱ्या ठिकाणी करावे लागले अंत्यसंस्कार.

सिंदखेड राजा: स्मशानभूमी नसल्याने तसेच अंत्यसंस्कार करण्यात येत असलेली जागेवर एकाने दावा केल्याने युवकाचे प्रेत तब्बल चार तास पडून हाेते. अखेर पाेलिसांच्या मध्यस्थिने प्रेतावर गावातील दुसऱ्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सिंदखेड राजा तालुक्यातील चिंचोली जहांगीर येथे ८ जानेवारी राेजी घडली.शिवाजी बाबुराव नागरे हा चाळीसितील तरुण चिंचोली येथील घर सोडून कष्ट करण्यासाठी बीड येथे रहात होता.ऊस तोड मजूर म्हणून काम करणाऱ्या शिवाजीचा त्याच भागात अपघाती मृत्यू झाला. गावात ही घटना कळताच कुटुंब,परिवार दुःखात बुडाले.सरकारी सोपस्कार पूर्ण करून शिवाजीचा मृतदेह चिंचोली येथे शुक्रवारी आणला गेला. पण दुर्दैव येथेही आड आले.गावात ज्या जागेवर अंत्यसंस्कार होतात ती जागा वैयक्तिक मालकीची आहे असा दावा करून प्रेतावर येथे अंत्यसंस्कार करता येणार नाही अशी भूमिका गावातील त्या जागा मालकाने घेतली. त्याच्यासोबत त्याचे समर्थकही होतेच..इकडे शिवाचा मृतदेह खांद्यावरून खाली ठेवून त्याचे नातेवाईक अंत्यसंस्कार कुठे करायचा या विवंचनेत होते. त्या जागा मालकाला अनेकांनी सांगितलं, पण यात चार तास गेले...मेल्यानंतरही अशी परवड कोणाचीही होऊ नये...अजून वेळ गेला असता तर संघर्ष झाला असता. परंतु सिंदखेडराजा येथील ठाणेदार जयवंत सातव,मंडळ अधिकारी राम बोंद्रे यांनी गावात जाऊन वातावरण शांत केले. गावातील एका ठिकाणी शिवाजीवर अंत्यसंस्कार झाले. पण त्यासाठी चार तास वाट पाहावी लागली. तालुक्यातील चिंचोली सारख्या असंख्य गावात स्मशान भूमी नसल्याचे असे प्रकार घडत आहेत.

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाSocialसामाजिक