शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

युरोपियन राजहंस पक्ष्यांचे कापशी तलावावर आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 11:08 IST

हे पक्षी तब्बल चार हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करून आणि हिमालयाच्या ३० हजार फूट उंचीवरून अकोला येथे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देसध्याच्या स्थितीत कापशी तलावात सुमारे ३४ पक्ष्यांचा थवा दिसून येत आहे. ४ हजार ३०० किलोमीटर अंतराचा प्रवास करून अकोलामध्ये आले आहेत. थंडीमुळे हे पक्षी भारतीय उपखंडातील विविध ठिकाणी स्थलांतर करतात.

- नीलिमा शिंगणे-जगडलोकमत न्यूज नेटवर्कअकोला: थंडी वाढताच तलावांवर स्थलांतरित पक्षी दिसून येऊ लागले आहेत. शहरापासून जवळच दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशिम रोड मार्गावरील कापशी तलावावर युरोप येथून बार हेडेड गुज पक्ष्यांचा (राजहंस) थवा दाखल झाला आहे. हे पक्षी तब्बल चार हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करून आणि हिमालयाच्या ३० हजार फूट उंचीवरून अकोला येथे दाखल झाले आहेत.रविवार ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास कापशी तलावामध्ये पक्षी मित्र तथा आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव, विवेक कोकाटे व त्यांच्या पत्नी, डॉ. जिराफे यांना पक्षी निरीक्षण करताना बार हेडेड गुज पक्ष्यांचा थवा दिसला. मंगोलिया, सायबेरिया, रशिया, अलास्का, युरोप आदी उत्तरीय ध्रुवाकडील देशामध्ये या कालावधीत मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो. यामुळे खाद्यासाठी पक्षी स्थलांतर करतात. यात भारतात येणाऱ्या पक्ष्यांची संख्या मोठी आहे. सध्याच्या स्थितीत कापशी तलावात सुमारे ३४ पक्ष्यांचा थवा दिसून येत आहे.बार हेडेड गुज हे पक्षी युरोप येथील विशेषत: मंगोलिया येथून सुमारे ४ हजार ३०० किलोमीटर अंतराचा प्रवास करून अकोलामध्ये आले आहेत. हिमालयाच्या साधारण ३० हजार फूट उंचीवरून ते उडतात. अशा वातावरणात आॅक्सिजनचे प्रमाण फार कमी असते. वाºयाचा प्रचंड वेग असतो. या पक्ष्यांचे मान हलविणे व चालणे पाहणाऱ्यांना आकर्षित करते. मानेवर काळ्या रंगाचा बारसारखा दिसणारा पट्टा असतो. म्हणून याला बार हेडेड गुज म्हणतात. हिंदीमध्ये याला राजहंस म्हणतात. ८ हजार उंचीवरून उडणारा एकमेव पक्षी आहे.हे विदेशी पक्षी सर्वसाधारणपणे युरोप, दक्षिण आफ्रिका या खंडांसह सायबेरिया, अफगाणिस्तान व हिमालय या भागातून स्थलांतर करून आपल्याकडे येतात. त्यांच्या मूळ प्रदेशात या काळात कमालीची थंडी किंवा काही ठिकाणी हिमवृष्टी होत असते. त्यामुळे तेथील पक्षी जीवन बाधित होते. त्यांना खाद्यान्नाचा तुटवडा भासू लागतो. त्यांच्या मूळ जागी पडत असलेल्या थंडीमुळे हे पक्षी भारतीय उपखंडातील विविध ठिकाणी स्थलांतर करतात. आपल्याकडील थंडीचा पक्षी येण्या-जाण्याशी संबंध नाही. हे स्थलांतरित पक्षी निवडक जलस्थाने, माळरानांवर आपले अन्न शोधतात. पुढील तीन-चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर हे पक्षी पुन्हा आपल्या मूळस्थानी परततात. दरवर्षी हाच क्रम अनुभवण्यास मिळतो, अशी माहिती लक्ष्मीशंकर यादव यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना दिली.

टॅग्स :Akolaअकोलाbirds sanctuaryपक्षी अभयारण्य