शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिमय वातावरणात आदिशक्तीची स्थापना

By admin | Updated: October 14, 2015 01:32 IST

नवदुर्गा उत्सव मंडळांनी भक्तिमय वातावरणात केली आदीशक्तीची स्थापना ; घरोघरीदेखील नवरात्रोत्सवाची घटस्थापना.

अकोला : 'आश्‍विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो। प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी हो। उदो बोला अंबाबाई माउलीचा हो।' या उद्घोषात, ढोल-ताशांच्या गजरात आदिशक्ती, आदिमायेच्या शहरातील नवदुर्गा उत्सव मंडळांनी मंगळवारी भक्तिमय वातावरणात स्थापना केली. घरोघरीदेखील नवरात्रोत्सवाची घटस्थापना करण्यात आली. नवदुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कौलखेड, आकोट फैल, गुलजारपुरा, जयहिंद चौक, जठारपेठेतील ज्योतीनगर, डाबकी रोड आदी ठिकाणच्या मूर्तिकारांकडे मूर्ती घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. मूर्तिकारही मूर्तीला श्रुंगार, साडी-चोळीसह सजवून देवींना निरोप देत होते. शहरात आकर्षक मंडप उभारण्यात आले असून, विद्युत रोशणाईसुद्धा केली आहे. अनेक मंडळांनी विविध सामाजिक संदेश देणारे देखावे, चित्ररथसुद्धा उभारले आहेत. महिला, तरुणींनीसुद्धा राऊतवाडी, गांधी रोड, जयहिंद चौक, लोखंडी पूल, सिटी कोतवाली चौक परिसरात शारदामातेची मूर्ती घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतून मंडळाचे कार्यकर्ते चारचाकी वाहने घेऊन मूर्ती नेण्यासाठी शहरात आले होते; ढोल-ताशे, वाद्यांच्या गजरात आणि 'जय माता दी', ह्यअंबा माता की जयह्णच्या जयघोषात मूर्ती नेताना दिसून येत होते. नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठही दुर्गाभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. बाजारात देवीची ओटी भरण्याचे साहित्य, खण-नारळ, साडी-चोळी आदी साहित्य विक्रीस उपलब्ध होते. आता नऊ दिवस आदिशक्तीच्या भक्तीचाच गजर राहणार आहे.