अकाेल्यात रविवारी विदर्भस्तरीय संमेलन
अकाेला : संपूर्ण देशात मुस्लिम समाज हा मागासलेला आहे. सच्चर आयाेगाने अल्पसंख्याक समाजासाठी उपाययाेजना सुचविल्या, त्यांचीही अंमलबजावणी नाही. अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचाही फारसा लाभ नाही; त्यामुळे आता महाज्याेती, सारथी, बार्टी सारखे अल्पसंख्याकांसाठी मार्टी स्थापन करावे व त्यासाठी २०० काेटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी अल्पसंख्याक एनजीओ फाेरमचे संस्थापक-अध्यक्ष जाकीर हुसेन शिकलगार यांनी केली अल्पसंख्याक एनजीओ फाेरमचे अकाेल्यात रविवारी विदर्भस्तरीय संमेलन हाेत असून, या संमेलनाच्या अनुषंगाने आयेाजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ते म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांकडे काेणाचेही लक्ष नाही. या समाजात सामाजिक कार्यकर्त्यांंचीही उणीव आहे. ती भरून काढण्यासाठी आणि समाजाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी ‘अल्पसंख्याक एनजीओ फाेरम’ची स्थापना करण्यात आली आहे. या फाेरमच्या माध्यमातून आम्ही सरकारच्या याेजना जनतेपर्यंत पाेहोचवीत आहाेत. त्यासाठी आम्ही मिशन आणि व्हिजन ठरविले आहे. राज्यात मायनाॅरिटी डेव्हलपमेंट सेंटर सुरू करणे, मानवी हक्क व कायदेशीर मंच स्थापन करणे, काैशल्य विद्यापीठ टेक्नाेिबिझ स्कूल शैक्षणिक संशाेधन व विकास केंद्र व्यवसाय मंच सुरू करणे अशा या फाेरमच्या अनेक संकल्पना आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक विकास नियंत्रण व देखरेख समितीची बैठक आयाेजित करणे, माैलाना आझााद महामंडळाचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरू करणे; अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचे बजेट १००० काेटींचे करणे या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रविवारी हाेणाऱ्या अल्पसंख्याक एनजीओ फाेरमच्या विदर्भस्तरीय संमेलनात १०० संस्थांनी नाेंदणी केली असून, या संमेलनातून सरकारला अल्पसंख्याकांचे प्रश्न व उपायाेजनांचा एक मुसदा पाठविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या वेळी अल्पसंख्याक एनजीओ फाेरमचे राज्य सदस्य माेहम्मद रफिक, जिल्हाध्यक्ष डाॅ.जुबेर नदीम, जिल्हा निरीक्षक मिर्जा खालिद, रजामाे परवेज अखत, आदी उपस्थित हाेते.
फाेटाे आहे