शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

सकल संतांच्या ग्रंथांचा सार म्हणजे ग्रामगीता!

By admin | Updated: December 25, 2016 02:41 IST

ग्रामगीताचार्य मनोहरदादा रेचे यांचे प्रतिपादन

अकोला, दि. २४- संतांनी मांडलेले विचार हे जीवनात परिवर्तन घडविणारे असतात. सर्व संतांनी मांडलेले विचार गं्रथ स्वरूपात उपलब्ध आहेत. ते आचरणात आणले पाहिजे. सकल संतांनी निर्माण केलेल्या गं्रथांचा सार म्हणजे ग्रामगीता असून, यामध्ये समाजातील सर्व समस्यांचे समाधान आहे, असे प्रतिपादन अंजनगाव सूर्जी येथील ग्रामगीताचार्य मनोहरदादा रेचे यांनी शनिवारी येथे केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती अकोलातर्फे स्वराज्य भवन प्रांगणात आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी ग्रामगीतेवर व्याख्यान देताना ते बोलत होते. राष्ट्रसंतांना वंदन करून त्यांनी ग्रामगीतेवरील व्याख्यानाला सुरुवात केली. मनोहरदादा रेचे यांनी आपल्या व्याख्यानादरम्यान विविध दाखले देऊन ग्रामगीतेची आजच्या काळातील उपयुक्तता पटवून सांगितली. वंदनीय तुकडोजी महाराजांनी सहज समजेल, अशा भाषेत तत्त्वज्ञान सांगितले. तत्त्वज्ञानाला अध्यात्माची जोड असेल, तरच ते समाजाच्या पचनी पडते. राष्ट्रसंतांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाला अध्यात्माची जोड आहे, म्हणूनच ग्रामगीता जनसामान्यांना आपली वाटते. ग्रामगीतेला अध्यात्माची जोड आहे. ग्रामगीतेमध्ये जगाच्या कल्याणाचा विचार मांडलेला आहे. ग्रामगीतेमध्ये ज्याला जे जे हवे, ते ते उपलब्ध आहे. जनसामान्यांच्या, शेतकर्‍यांच्या सर्व समस्यांची उकल ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी केली आहे. संत सहज बोलले तरी तो हितोपदेश ठरतो. संत कधीही बाष्कळ चर्चा करीत नाहीत. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत समाजातील सर्वच घटकांचा विचार केला आहे. भागवत गीतेचे सक्रिय स्वरूप म्हणजे ग्रामगीता आहे, असे विचार मनोहरदादा रेचे यांनी मांडले. ग्रामगीता ताठ मानेने जगायला शिकविते!ज्याला स्वत:चा परिचय झाला, स्वत:चा आत्मा कळला, तोच इतरांचे कल्याण करू शकतो. ज्याला स्वत:चाच परिचय झाला नाही, तो इतरांसाठी काहीही करू शकत नाही. ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी स्वत:ला ओळखण्याचा सल्ला दिला आहे. ग्रामगीता हताश, निराश झालेल्या समाजाला नवसंजीवनी देणारी आहे. हतबल झालेल्या व्यक्तीला ग्रामगीता ताठ मानेने जगणे शिकविते, असे विवेचन रेचे यांनी केले.