शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अटक टाळण्यासाठी पुलावरून उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:31 IST

११ बैलांना जीवनदान : विशेष पथकाची कारवाई; आरोपी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावरून अमरावतीकडून एका वाहनातून ११ बैलांना अक्षरश: कोंबून कत्तलीसाठी अकोलाकडे नेणाऱ्या एका मालवाहू वाहनास बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील काटेपूर्णा बस थांब्यानजीक जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकाने अडवले असता, त्या वाहनाच्या चालकाने अटक टाळण्यासाठी तेथील पुलावरून खाली उडी घेतल्याची घटना २१ जुलैच्या सकाळी घडली. यामुळे सदर आरोपी गंभीर जखमी झाला. सदर विशेष पथकाने ११ बैलांना जीवनदान देऊन सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..काही आरोपी राष्ट्रीय महामार्गावरून अमरावतीहून अकोलाकडे एका मालवाहू वाहनातून काही बैलांना कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळासपुरे यांना शुक्रवारी सकाळी मिळाली. त्यामुळे त्यांनी काटेपूर्णानजीक एमएच ३० एबी २०९९ क्रमांकाच्या मालवाहू वाहनास थांबविले असता, त्यामध्ये ११ बैलांना हातपाय बांधलेल्या स्थितीमध्ये निर्दयतेने कोंबले असल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलीस पथकाला पाहून चालक जमीर खान वहीद खान याने पळ काढला व काटेपूर्णा नदीच्या पुलावरून खाली उडी घेतली. त्यामध्ये तो जखमी झाला. त्यास उपचाराकरिता अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी मो. जहीर कुरेशी, मो. शारीक कुरेशी, फयाज मो. कुरेशी या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ८८ हजार रुपये किमतीचे ११ बैल, पाच लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन, १४ हजार रुपये किमतीचे पाच मोबाइल असा एकूण सहा लाख दोन हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या ११ बैलांना अकोला येथील गोरक्षणमध्ये दाखल केले, अशी माहिती पथकप्रमुख अळासपुरे यांनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास बोरगाव मंजूचे ठाणेदार पी. के. काटकर करीत आहेत.