शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात उद्रेक; ३३५ जण काेराेना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST

महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असली तरीही ...

महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असली तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याची परिस्थिती आहे. मागील काही दिवसांत काेराेनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. राज्य शासनाने लागू केलेले कडक निर्बंध झुगारून देत नागरिक साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्याचे परिणाम सर्वांना भाेगावे लागत आहेत़ बुधवारी शहरातील तब्बल ३३५ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे मनपा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे़

पूर्व व दक्षिण झाेनमधील स्थिती गंभीर

शहरात काेराेनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहे. दाेन्ही झाेनमधील रुग्णांची वाढती संख्या पाहता हाॅटस्पाॅट ठरलेल्या या झाेनमध्ये उपाययाेजना करण्यास प्रशासन सरसावले आहे. बुधवारी पूर्व झोनमध्ये काेराेनाचे तब्बल १६१ रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये ४६, उत्‍तर झोनमध्ये ४१ व दक्षिण झोनमध्ये ८७ असे एकूण ३३५ रुग्ण आढळून आले आहेत.

चाचणीसाठी धावाधाव

काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे पाहून चाचणीसाठी नागरिक आता धावाधाव करीत आहेत़ सद्यस्थितीत शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मनपाने शहरात झाेननिहाय चाचणी केंद्र सुरू केले़ या ठिकाणी बुधवारी १५२९ जणांनी चाचणी केल्याचे समाेर आले. यामध्ये ४३६ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच १०९३ जणांनी रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणी केली. संबंधितांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़