शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या निर्यातीसाठी ‘एपीडा’ मदत करणार -प्रशांत वाघमारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:33 IST

अकोला : पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी विदेशामध्ये आपल्या शेतामालाची निर्यात करीत आहेत. एपीडाच्या माध्यमातून त्यांना शेतमालाच्या निर्यातीसाठी सहकार्य केले. त्याचप्रमाणे विदर्भातील शेतकर्‍यांनी त्यांच्या मालाची विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा) शेतकर्‍यांना मदत करणार, अशी माहिती एपीडाचे सहायक महाप्रबंधक प्रशांत वाघमारे यांनी दिली. 

ठळक मुद्देनिर्यातीबाबत ‘एपीडा’ची भूमिका मांडली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी विदेशामध्ये आपल्या शेतामालाची निर्यात करीत आहेत. एपीडाच्या माध्यमातून त्यांना शेतमालाच्या निर्यातीसाठी सहकार्य केले. त्याचप्रमाणे विदर्भातील शेतकर्‍यांनी त्यांच्या मालाची विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा) शेतकर्‍यांना मदत करणार, अशी माहिती एपीडाचे सहायक महाप्रबंधक प्रशांत वाघमारे यांनी दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात आयोजित ‘कृषी निर्यातीमध्ये एपीडाची भूमिका’ या चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रशांत वाघमारे यांनी, कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा) शेतकर्‍यांच्या कृषी उत्पादन आणि कृषी प्रक्रिया मालाची विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी काम करणारी संस्था आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाचा दर्जा पाहून, तो शेतमाल विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी एपीडा मार्गदर्शन करते. त्यांना प्रशिक्षण देते. एपीडाच्या माध्यमातून शेतकर्‍यांची निर्यातदारांसोबत भेट घालून, त्यांच्या शेतमालाची पाहणी केली जाते. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी उद्योजक झाले आहेत. विदर्भातील शेतकरीसुद्धा निर्यातीकडे वळावे, या दृष्टिकोनातून एपीडाने विदर्भाकडे लक्ष केंद्रित केले आहे. चांदूर रेल्वे येथील शेतकर्‍यांची ३00 टन मिरची दुबई व कतार येथे निर्यात करण्यात आली. त्याचा त्यांना चांगला नफाही मिळाला. त्यामुळे अकोला, वाशिम व अमरावती जिल्हय़ांमधील शेतकर्‍यांनी शेतमालाच्या निर्यातीकडे वळले पाहिजे, असे मार्गदर्शन एपीडाचे सहायक महाप्रबंधक प्रशांत वाघमारे यांनी केले. 

अकोटच्या केळींना दुबईत मागणीअकोट तालुक्यातील काही शेतकर्‍यांची एपीडाने निर्यातदारांसोबत भेटी घालून दिल्या. निर्यातदारांनी त्यांच्या केळींचे नमुने पाठविले. केळी दर्जेदार असल्याने, दुबईतील व्यापार्‍यांनी मागणी केली. 

टॅग्स :Agrotech 2017 Akolaअ‍ॅग्रोटेक २0१७ अकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ