शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के मोफत जागांवर लवकर प्रवेश प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 13:37 IST

अकोला: शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत वंचित व दुर्बल गटातील पालकांच्या विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक शाळा वगळता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविली जाते.

अकोला: शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत वंचित व दुर्बल गटातील पालकांच्या विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक शाळा वगळता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविली जाते. यंदासुद्धा २0१९-२0 साठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागातर्फे लवकरच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.दरवर्षी शिक्षण विभागामार्फत वंचित व दुर्बल गटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि. जा. (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्गीय (ओबीसी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी, एचआयव्ही बाधित, प्रभावित बालके आणि ज्या बालकांच्या पालकांचे उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत आहे. अशा बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांवर मोफत देण्यात येतो. गतवर्षी अकोला जिल्ह्यातील आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या २0८ इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील २४८२ जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. या सर्व जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाइन व लॉटरी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. २४८२ जागांसाठी जिल्हाभरातून एकूण ४ हजार ९८७ अर्ज आले होते. त्यानुसार १९७0 विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला होता. यंदासुद्धा एवढ्याच जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदा