शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडात २०० ठिकाणी ऊर्जा बचत, परीक्षण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 18:27 IST

अकोला : शासकीय कार्यालय, औद्योगिक क्षेत्र तसेच शाळा-महाविद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये विजेचा वाढलेला भरमसाट वापर कमी करण्यासाठी ऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांमधील २०० ठिकाणांवर राबविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

- सचिन राऊतअकोला : शासकीय कार्यालय, औद्योगिक क्षेत्र तसेच शाळा-महाविद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये विजेचा वाढलेला भरमसाट वापर कमी करण्यासाठी ऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांमधील २०० ठिकाणांवर राबविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामध्ये ऊर्जा बचत योजना ४५ आस्थापनांमध्ये राबविण्यात येणार असून, प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना १५० आस्थापनांमध्ये राबविण्यात येणार आहे.अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये ऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना (एनर्जी आॅडिट एनर्जी सेव्ह प्रोग्राम) राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. यामध्ये अकोला महापालिकेला २५ लाख रुपयांचा धनादेश देऊन या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर तीन जिल्ह्यांतील शासकीय कार्यालय, औद्योगिक संस्था, निमशासकीय कार्यालय, मोठे खासगी उद्योग या ठिकाणावर ऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे तब्बल ३० टक्के विजेचा वापर कमी होणार असल्याची माहिती आहे.

नोंदणीकृत संस्थेकडून आॅडिटऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजनेचे आॅडिट मुंबई येथील नोंदणीकृत असलेली एआरएस एनर्जी आॅडिटर्स यांच्याकडून करण्यात येणार आहे. या योजनेचे तीन जिल्ह्यांतील शासकीय कामकाज विभागीय व्यवस्थापक विनोद एस. शिरसाट यांच्या निदर्शनात प्रदीप ऊर्फ राजू फाटे यांच्या ओम नम:शिवाय इलेक्ट्रिकल्सकडून पाहण्यात येणार आहे. यासाठीचा करार करण्यात आला. केवळ ऊर्जा वाचविण्यासाठी अत्यंत माफक दरात हे कामकाज पाहण्यात येणार आहे.ऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना कार्यान्वित क रण्यात आली आहे. यासाठी शासकीय कार्यालय, औद्योगिक क्षेत्रातील कार्यालय आणि खासगी संस्थांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभीकरणच्या विभागीय कार्यालयाशी संपकर् साधावा. ‘प्रथम अर्ज-प्रथम लाभ’ याप्रमाणे लाभार्थींना लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे ३० टक्के विजेचा वापर कमी होऊन वीज बचत होणार आहे.- जयप्रकाश गारमोडे, व्यवस्थापक, महाऊर्जा अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण