शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्री आज जिल्ह्यात

By admin | Updated: May 18, 2017 00:49 IST

जनतेशी साधणार थेट संवाद : महावितरणच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १८ व १९ मे २०१७ रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यातील महावितरणच्या पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व मंजूर कामांचे भूमिपूजन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.गुरुवार, १८ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र येथे ऊर्जामंत्री कामाचा आढावा घेणार आहेत. शुक्रवार, १९ मे रोजी सकाळी ९ वाजता दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत मंजूर असलेले जिल्ह्यातील अकोली जहागीर, कान्हेरी सरप, कुरुम, माळेगाव बाजार व पिंपरीकड तसेच आयपीडीएस. योजनेंतर्गत मंजूर सुधीर कॉलनी व न्यू एमआयडीसी या सर्व ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रांचा भूमिपूजन सोहळा तसेच अकोट विभागाचे लोकार्पण ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांच्या हस्ते अकोला येथील विद्युत भवन येथे होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील ऊर्जाविषयक व इतर विविध प्रश्नांवर लोकप्रतिनिधीसोबत बैठक घेणार असून, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. शुक्रवारी जनता दरबारशुक्रवार, १९ मे रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यालयाच्या ए.आर. ठाकरे सभागृह अकोला येथे जनतेशी संवाद हा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ऊर्जामंत्री बावनकुळे हे नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याकडून महावितरण, महापारेषण, राज्य उत्पादन शुल्क या विभागासंबंधीच्या आलेल्या तक्रारी, सूचना व निवेदने यांचे निराकरण करणार आहेत. यावेळी महावितरण, महापारेषण, महाऊर्जा या कंपनीचे कनिष्ठ व वरिष्ठ अधिकारी, विद्युत निरीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षक ते वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.