लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पूर्व झोनमध्ये उमरी परिसरातील संताजी नगर येथे शासकीय जागेवर अतिक्रमण करून उभारलेल्या घराचे बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने शनिवारी केली. उमरीस्थित संताजी नगर परिसरात नारायण सोनोने यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून घराचे बांधकाम केले होते. हा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर सिव्हिल लाइन पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमित घराचे बांधकाम पाडण्याची कारवाई मनपाच्या अतिक्रमण विभागाने केली. यावेळी पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, सिव्हिल लाइनचे ठाणेदार अनवर शेख, अतिक्रमण अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर, सुरक्षा अधिकारी मूलसिंग चव्हाण, सहा. अधिकारी प्रवीण मिश्रा, संजय थोरात, विजय बडोणे, अँड. प्रवीण इंगोले, प्रवीण इंगळे आदी उपस्थित होते.
शासकीय जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त
By admin | Updated: July 9, 2017 09:17 IST