शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 12:36 IST

स्त्यालगत नव्हे, तर चक्क रस्त्यावरच अनधिकृतपणे पेव्हर ब्लॉक व त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुप्पी साधली आहे.

अकोला: सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवरील मुख्य चौकात एका कमर्शियल कॉम्प्लेक्सच्यावतीने उभारण्यात आलेले अतिक्रमण अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. रस्त्यालगत नव्हे, तर चक्क रस्त्यावरच अनधिकृतपणे पेव्हर ब्लॉक व त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुप्पी साधली आहे. थेट मुख्य रस्त्यावर उभारलेल्या अतिक्रमणाकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने कोणाचे खिसे जड झाले, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून गांधी रोडकडे पाहिल्या जाते. सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून ते रेडीमेड कपड्यांसह विविध वस्तूंची या परिसरात बाजारपेठ आहे. शहरातील खवय्यांची गांधी चौकातील चौपाटीवर चांगलीच गर्दी राहते. गर्दीमुळे अकोलेकरांना गांधी रोडवरून चालताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते. गांधी रोड परिसरातील वाढत्या अतिक्रमणामुळे अकोलेकरांच्या समस्येत भर पडली आहे. गांधी चौकातील अतिक्रमकांकडे महापालिका प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्यामुळेच अतिक्रमकांच्या दादागिरीने उचल खाल्ली आहे. गांधी चौकातील एका कमर्शियल कॉम्प्लेक्सच्यावतीने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली चक्क रस्त्यावरच पेव्हर ब्लॉक उभारून त्याला लाखेंडी ग्रील लावली आहे. पेव्हर ब्लॉक बसविताना मनपाचे सर्व निकष नियम पायदळी तुडवत गांधी चौकातील थेट मुख्य रस्त्याचा वापर करण्यात आला आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना लघू व्यावसायिक त्यांच्या हातगाड्या लावून व्यवसाय करीत असल्यामुळे मुख्य रस्त्यावरून चालावे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.करारनामा पायदळी; मनपाची चुप्पीगांधी चौकातील एका कमर्शियल कॉम्प्लेक्सच्यावतीने दुकानांना सुरक्षा व्हावी, म्हणून चक्क रस्त्यावर पेव्हर ब्लॉक उभारून त्याला लोखंडी ग्रिल लावण्यात आले. या अनधिकृत कामासाठी चक्क नियमांचा वापर करून गांधी चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मनपासोबत करारनामा करण्यात आला. रस्त्यालगतच्या गोरगरीब लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांची वाहने जेसीबीखाली चिरडणाऱ्या महापालिकेला सदर अतिक्रमण दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पार्किंगच्या जागेवर व्यवसाय कसा?गांधी चौकातील दुर्गा देवीच्या मंदिरासमोरील जागा पार्किंगसाठी राखीव आहे. या ठिकाणी पार्किंग स्टॅन्ड निर्माण करण्यात आले असले तरी सदर जागेवर अतिक्रमकांनी व्यवसाय उभारल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना त्यांची वाहने ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने कुचंबणा होत आहे.करारनामा रद्द का नाही?गांधी चौकात उभारण्यात आलेल्या सौंदर्यीकरणाचा करार नगररचना विभागासोबत करण्यात आला आहे. या सौंदर्यीकरणामुळे गांधी चौकात अतिक्रमणाची समस्या निर्माण झाली असून, वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. ही समस्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने हा करारनामा रद्द करून उभारण्यात आलेले अतिक्रमण तातडीने काढावे, अशी मागणी अकोलेकर करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका