वाशिम : शहरात अतिशय जुने असलेले ह्यटेम्पल गार्डनह्ण अतिशय दुर्लक्षित झाले असून या गार्डनला संपूर्ण अतिक्रमणाने वेढले आहे.अतिशय मोक्याच्या जागेवर व शहरापासून सर्वच दिशेने जवळ असलेल्या टेम्पल गार्डनबाबत कोणीही पुढाकार घेत नसल्याने शासनाची एवढी मोठी जागा व्यर्थ ठरत होती मात्र नगरपरिषदेने त्या जागेवर आता नाटयगृह निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत निवीदाही मागविण्यात आले आहे. अकोला नाका नजिक असलेल्या टेम्पल गार्डनला मुख्य ठिकाणी अतिक्रमणाचा विळखा असून टेम्पल गार्डन कुठे आहे दिसतच नाही. इंग्रजकालीन असलेल्या टेम्पल गार्डनमध्ये नाटयगृह उभारण्यात येणार असल्याच्या बातमीने नाटयप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर काम लवकरात लवकर सुरू व्हावे अशी अपेक्षा नाटयप्रेमींमध्ये दिसून येत आहे. नाहीतर टेम्पल गार्डन बनता बनता राहिले तसेच नाटयगृहा संदर्भात होवू नये. असेही नागरिक बोलत आहेत.
गार्डनला अतिक्रमणाचा विळखा
By admin | Updated: May 10, 2014 22:22 IST