अकोला - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज गत ३0 वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरू असून, ही इमारत दोन महिन्याच्या आत खाली करण्याचे आदेश वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश मसंद यांच्या न्यायालयाने सोमवारी दिले आहे त. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज १९८५ पासून राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या महेश भवनमध्ये कार्यरत आहे. या इमारतीचे दर महिन्याचे भाडे ११ हजार ३८८ रुपये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात येत असून, हे भाडे अल्प असल्याने भाड्यात वाढ करण्याची मागणी इमारतीचे मालक गौरव महेश शर्मा यांनी केली. मात्र, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून भाडेवाढीच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने इमारतीच्या भाडेवाढीसाठी महेश शर्मा यांनी २0१0 मध्ये न्यायालयात धाव घेतली. इमारतीचे भाडे वाढवून देण्यात यावे किंवा सदर इमारत खाली करण्याची मागणी त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जाद्वारे केली. स् ादर प्रकरण २0१0 पासून न्यायालयात असताना वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश मसंद यांच्या न्यायालयाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दोन महिन्याच्या आत खाली करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे गत ३0 वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरू असलेला उपप्रादेशिक परिवहन विभागाचा कारभार आता लवकरच दुसर्या ठिकाणावरून चालविण्यात येणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत रिकामी करा
By admin | Updated: April 17, 2015 01:53 IST