शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनासाठी ‘वंचित’ची सत्तासंपादन महारॅली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 13:43 IST

भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या नागपूर ते कोल्हापूर सत्तासंपादन महारॅलीचे अकोल्यात आगमन.

अकोला : राज्यात सरकारप्रती लोकांचा रोष दिसत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तनासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सत्तासंपादन महारॅली काढण्यात आली आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील यांनी मंगळवारी येथे केले.भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या नागपूर ते कोल्हापूर सत्तासंपादन महारॅलीचे अकोल्यात आगमन झाल्यानंतर अशोक वाटिका येथे आयोजित स्वागत सभेत ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते नवनाथ पडळकर व विजय मोरे उपस्थित होते. राज्यातील वेगवेगळ्या समूहातील वंचितांना न्याय देण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे, असेही अण्णाराव पाटील यांनी सांगितले. सत्तासंपादन महारॅलीचे अकोला शहरात आगमन झाल्यानंतर अशोक वाटिका येथे स्वागत सभा घेण्यात आली. यावेळी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, हिरासिंग राठोड, पी. जे. वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, सैफुल्ला खान, प्रभा शिरसाट, शोभा शेळके, डॉ. एम. आर. इंगळे, दिनकर वाघ, संध्या वाघोडे, वंदना वासनिक, भाऊसाहेब थोरात, शंकरराव इंगळे, श्रावण ठोसर, अशोक शिरसाट, डॉ. रहेमान खान, सुभाष रौंदळे, दामोदर जगताप, काशीराम साबळे, गजानन गवई, राजुमिया देशमुख, केशवराव बिलबिले, कश्यम जगताप, प्रा. संतोष हुशे, अ‍ॅड. संतोष रहाटे, बालमुकुंद भिरड, सम्राट सुरवाडे, डॉ. प्रसन्नजित गवई, पुष्पा इंगळे, अनघा ठाकरे, विद्या अंभोरे, पराग गवई, सचिन शिराळे, विकास सदांशिव, सुषमा कावरे, योगिता वानखडे, कविता राठोड, मंगला शिरसाट, प्रा. मंतोष मोहोड, कोकिळा वाहुरवाघ, संगीता खंडारे, पुरुषोत्तम अहिर, गजानन दांडगे, सागर कढोणे, प्रा. शैलेश सोनोने, सम्राट डोंगरदिवे, अमोल शिरसाट यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, भारिप-बमसं व वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी