शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी पॉझिटिव्ह; तेल्हारा ‘तहसील’ सील नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 10:51 IST

कार्यालय सील करण्याची गरज होती; परंतु प्रशासनाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : आरोग्य विभागाने घेतलेल्या रॅपिड टेस्ट अंतर्गत तहसील कार्यालयातील एक कर्मचाऱ्याचा अहवाल ३१ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तहसील कार्यालयात निर्जंतुकीकरण करून कार्यालय सील करण्याची गरज होती; परंतु प्रशासनाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.तालुक्याचा प्रशासकीय कारभार तहसील कार्यालयातून चालतो. तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ३१ जुलै रोजी रॅपिड टेस्ट करण्यात आली. यात एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून तहसील कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करून कार्यालय सील करण्याची गरज होती; परंतु प्रशासनाने कोणतीच खबरदारी न घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाहीत. लोकां सांगे, ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण या म्हणीचा प्रत्यय तहसील कार्यालय प्रशासनाकडून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.नागरिकांना मात्र नियमांचे पालन करण्यास तहसीलदार व त्यांच्या कर्मचाºयांकडून सांगण्यात येते. स्वत: मात्र नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याने, या अधिकाºयांना कुणी बोलावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही तहसील प्रशासन गंभीर दिसत नाही.अद्याप तहसील कार्यालय सील करण्याबाबत आरोग्य विभागाकडून पत्र प्राप्त झाले नाही. पत्र प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.- राजेंद्र सुरडकर, तहसीलदार, तेल्हारातालुका आरोग्य अधिकारी यांना पत्र देण्यासाठी अवगत केले आहे. उद्या तहसीलदार यांना पत्र देण्यात येईल आणि तहसील कार्यालय सील करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.- भरत चव्हाण, गटविकास अधिकारी, तेल्हारा

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराcorona virusकोरोना वायरस बातम्या