शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मसाले, सुगंधी वनौषधी लागवडीवर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 14:11 IST

कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल प्रकल्प उभा केला आहे.

अकोला : राज्यातील मसाला पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सुगंधी औषधी वनस्पती पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे, यासाठीचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. विदर्भात सुगंधी औषधी वनस्पतीच्या व्यावसायिक शेतीवर भर देण्यात येत असून, या कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल प्रकल्प उभा केला आहे. यानुषंगाने शेतकऱ्यांना या पिकांच्या ‘शाश्वत शेतीसाठी अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर अकोल्यात दोन दिवस मंथन होणारआहे.या प्रकल्पाचा आदर्श घेत विदर्भातील मोजक्या शेतकºयांनी सध्या तिखाडी तेल गवताची व्यावसायिक शेती सुरू केली आहे. अंजनगाव सुर्जी येथील शेतकºयांनी तिखाडी तेल निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी माईनमुळा (कोलिअस) या औषधी वनस्पतीचा शेती प्रयोग केला. भंडारा, वर्धा जिल्ह्यात वनस्पतीची लागवड करण्यात येत आहे. या शेतीला व्यापक स्वरू प देण्यासाठी कृषी विद्यापीठाने मोहीम हाती घेतली असून, शेतकºयांनी सुगंधी वनस्पतीची व्यावसायिक लागवड करावी, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाºया या चर्चासत्रामध्ये मसाला व सुगंधी वनस्पती पिकांबाबत अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, पीक संरक्षण, मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे मूल्यसंवर्धन तथा प्रक्रिया, विपणन व स्वयंरोजगाराच्या संधी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 तिखाडी गुणकारीतिखाडी हे तेल गुणकारी असून, गुडघे, सांधेदुखीवर या तेलाचा उपयोग करण्यात येतो. नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल निर्मिती प्रकल्प असून, माफक दरात तिखाडी तेलाचा पुरवठा गरजवंतांना उपलब्ध करण्यात येत आहे.

नागार्जुन उद्यानात ५०० वनस्पतींचे जतनवनस्पती औषधी शेतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनस्पती उद्यानात सुगंधी औषधी वनस्पतीची रोपे व बियाणे शेतकºयांसाठी ठेवण्यात आली आहेत. यात कोरफड, शतावारी, क रंज, बिहाडा, गुग्गुळ, अडुळसा, पानफुटी, निरगुडी, सुगंधी गवत, तिखाडी, खस (वाळा), ही रोपे तर कौचा, अश्वगंधा, अक्कलकारा, बिक्झा इत्यादींच्या बियाण्यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोला