शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘हीरक महोत्सवी’ अभियानात स्वच्छता, सौंदर्यीकरणावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 15:44 IST

मनपाकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ असल्याने स्वच्छतेची कामे सहज निकाली निघणे शक्य होणार आहे.

अकोला: ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी नगर विकास विभागाने १ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत राज्यात ‘हीरक महोत्सवी अभियान’राबविण्याचे निर्देश जारी केले. या अभियान अंतर्गत शहरातील स्वच्छता व सौंदर्यीकरणावर भर देण्यात आल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत स्वच्छतेच्या कामासाठी मनपाकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ असल्याने स्वच्छतेची कामे सहज निकाली निघणे शक्य होणार आहे. यासाठी प्रशासनाचे नियोजन व कर्मचाºयांच्या इच्छाशक्तीची गरज असून, यानिमित्ताने प्रशासनाची कार्यक्षमता दिसून येणार आहे.१ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा केला जाणार असून, यानिमित्ताने स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत महापालिका क्षेत्रात ‘हीरक महोत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान’राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या अभियानात घनकचºयासोबतच बांधकाम आणि पाडकाम कचºयाचीही विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. ३० एप्रिलपर्यंत राबविल्या जाणाºया अभियानात रस्त्यांच्या दुरुस्तीचाही समावेश करण्यात आला आहे. स्वच्छता व सौंदर्यीकरणावर विशेष भर देण्यात आला असून, सदर कामासाठी मनपा प्रशासनाकडे पुरेशा प्रमाणात कर्मचाºयांचे संख्याबळ उपलब्ध आहे. त्या पृष्ठभूमिवर मनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडून प्रत्यक्षात कोणत्या उपाययोजना राबविल्या जातात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.स्वच्छता विभागाची परीक्षामनपाच्या स्वच्छता विभागात साफसफाईसाठी आस्थापनेवर ७४८ सफाई कर्मचारी आहेत. यापैकी काही कर्मचारी विविध विभागांच्या बिळात दडून बसले आहेत. ११ पेक्षा जास्त पडीत प्रभागांमध्ये ६१६ पेक्षा अधिक खासगी कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर देखरेखीसाठी आरोग्य निरीक्षकांची फौज आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जमा होणारा कचरा थेट डम्पिंग ग्राउंडवर साठवला जात असल्याने सफाई कर्मचाºयांवरील कामाचा ताण कमी झाला आहे. अर्थातच, सदर अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता विभागाची परीक्षा दिसून येईल.रस्त्यांलगत मातीचे ढीग!संपूर्ण शहरात उघड्यावर मातीचे ढीग आहेत. ज्या ठिकाणी विकास कामे सुरू नाहीत, त्याठिकाणीसुद्धा माती, धूळ व कचरा साचल्याचे चित्र आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, रस्त्यांच्या दुभाजकालगत मातीचे ढीग आहेत. धुळीमुळे अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात आले असताना स्वच्छता विभागाचे आरोग्य निरीक्षक कोणते कर्तव्य निभावत आहेत,असा सवाल उपस्थित होतो. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका