शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या तुटवड्यामुळे आपत्कालीन भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 19:19 IST

गत दोन दिवसांपासून महावितरणकडून भारनियमन केले जात असल्याने दोन ते तीन तास वीज पुरवठा बंद राहत असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

उकाड्याने नागरिक हैरान : वीजेची मागणी वाढलीअकोला : उन्हाळय़ात वाढलेली वीजेची मागणी पुर्ण करताना महावितरणला चांगलीच कसरत करावी लागत असून, विजेच्या तुटवड्यामुळे जिल्हय़ात महावितरणकडून सर्वच फिडरवर सातत्याने आपत्कालिन भारनियमन करावे लागत आहे. गत दोन दिवसांपासून महावितरणकडून भारनियमन केले जात असल्याने दोन ते तीन तास वीज पुरवठा बंद राहत असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. विजेची वाढती मागणी व प्रत्यक्ष पुरवठा यामधील तफावत वाढत असल्याने गत काही दिवसांपासून महावितरणकडून आपत्कालीन भारनियमन करण्यात येत आहे. शुक्रवार आणि शनिवारी महावितरणकडून विविध ग्रुपवर आपत्कालीन भारनियमन करण्यात आले. तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहचले असताना होणार्‍या या भारनियमनामुळे नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. शनिवारी भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार, ई, एफ, जी १, जी २, जी ३ या ग्रुपवर टप्प्या-टप्प्याने भारनियमन करण्यात आले. यामुळे विविध फिडरवरील वीज पुरवठा दोन ते तीन तास खंडित होता. सध्या उन्हाचा कडाका वाढला असताना नागरिकांकडून विजेच्या उपकरणांचा वापर वाढला आहे. गारवा देणारे कुलर, एसी, पंखे आदी उपकरणे बंद राहिल्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान, सायंकाळी सर्वच ग्रुपवरील भारनियमन मागे घेण्यात आले.पाणीपुरवठा विस्कळितसद्या जिल्हय़ात सर्वत्र पाणीटंचाईचे चित्र आहे. ग्रामीण भागात आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एक वेळ असा पाणीपुरवठा केला जात आहे. भारनियमनामुळे काही गावांमध्ये योगायोगाने पाणीपुरवठय़ाच्या दिवशीच वीज गुल होते. त्यामुळे त्या गावात त्या दिवशी पाणीपुरवठा होऊ शकत नाही.